Kirti Shiledar: सहा दशकांचा सूर हरपला; ज्येष्ठ गायिका कीर्ती शिलेदार यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2022 09:29 AM2022-01-22T09:29:14+5:302022-01-22T09:37:46+5:30

संगीत कान्होपात्रा, ययाती आणि देवयानी, संशय कल्लोल, स्वयंवर, संगीत सौभद्र, मृच्छ कटिक, मंदोदरी, एकच प्याला या सारख्या नाटकांना कीर्ती शिलेदार यांचा सूर मिळाला होता.

Kirti Shiledar death: Veteran singer Kirti Shiledar passes away | Kirti Shiledar: सहा दशकांचा सूर हरपला; ज्येष्ठ गायिका कीर्ती शिलेदार यांचे निधन

Kirti Shiledar: सहा दशकांचा सूर हरपला; ज्येष्ठ गायिका कीर्ती शिलेदार यांचे निधन

googlenewsNext

ज्येष्ठ गायिका आणि संगीत नाट्यात मोलाची कामागिरी केलेल्या किर्ती शिलेदार यांचं आज निधन झालं पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांनी वयाच्या 71 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. अनेक दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. डायलिसिसचे उपचार सुरू असल्याने त्यांची तब्येत आणखी खालावली संगीत रंगभूमीच्या पडत्या काळात त्यांनी मोलाची कामगिरी बजावली. नाट्य संगीतातील त्यांच्या घराण्याचा वारसा कायम स्मरणात राहिल अशी कामगिरी त्यांनी केलेली आहे. 

सकाळी त्रास होऊ लागल्यानंतर त्यांना उपचारासाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले; पण उपचाराला प्रतिसाद न मिळाल्यानं त्यांची प्राणज्योत मालवली. रंगभूमीवरील जयराम आणि जयमाला शिलेदार या दाम्पत्याच्या पोटी जन्मलेल्या कीर्ती शिलेदार यांनी मराठी रंगभूमीसाठी बहुमूल्य योगदान दिलं आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

संगीत कान्होपात्रा, ययाती आणि देवयानी, संशय कल्लोळ, स्वयंवर, संगीत सौभद्र, मृच्छ कटिक, मंदोदरी, एकच प्याला या सारख्या नाटकांना कीर्ती शिलेदार यांचा सूर मिळाला होता. वयाच्या दहाव्या वर्षी कीर्ती शिलेदार यांनी रंगभूमीवर पहिलं पाऊल ठेवले होते. अशाप्रकारे त्यांनी वयाची साठ वर्षे मराठी रंगभूमीसाठी दिली. अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. 

पुणे विद्यापीठातून साहित्य शाखेच्या पदवी घेतलेल्या कीर्ती शिलेदार यांच्ची भूमिका असलेल्या नाटकांचे आजवर ४०००हून अधिक प्रयोग झाले आहे. देशातल्या मराठी रसिकांसाठीही त्यांनी देशाच्या विविध शहरांत मराठी संगीत नाटकांचे प्रयोग केले. संगीत कान्होपात्रासह जुन्या नाटकातल्या गाण्यांचा गोडवा त्यांनी नव्या पिढीपर्यंत पोहोचवला. गोड गळा आणि शास्त्रीय संगीतासाठी केलेल्या प्रचंड परिश्रमामुळे कीर्ती शिलेदार यांनी संगीत मराठी नाटकात केलेल्या सर्वच भूमिका गाजल्या. बालगंधर्वांच्या सुवर्ण युगाची आठवण यावी, अशा एकरूपतेने कीर्ती शिलेदार यांनी गायलेली गीते रसिकांनी डोक्यावर घेतली. संगीत नाटक हेच त्यांच्या आई, वडिलांचा श्वास आणि ध्यास होता. आपल्या आई, वडिलांची संगीत मराठी नाटकांच्या सेवेचा हाच वारसा जपताना कीर्ती शिलेदार यांनी, कीर्ती आणि पैशाचा मोह बाजूला ठेवत, मराठी संगीत रंगभूमीची सेवा साठहून अधिक वर्षे अविरतपणे केली. मराठी संगीत रंगभूमीच्या त्या सर्वार्थाने बिनीच्या शिलेदार होत्या.

Web Title: Kirti Shiledar death: Veteran singer Kirti Shiledar passes away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.