किसान ऋण मुक्ती यात्रा पुण्यातून पुढे रवाना, शेतकरी कुटुंबीयांचे जोरदार स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2017 01:07 AM2017-11-19T01:07:55+5:302017-11-19T01:08:06+5:30
कोल्हापूरहून निघालेली किसान ऋण मुक्ती यात्रा रेल्वे मध्यरात्री पुणे रेल्वे स्टेशनला आली. तिचे जोरदार स्वागत करण्यात आले. पुणे या ठिकाणी मराठवाड्यातील सर्व शेतकरी कुटुंबियांचे स्वागत करुन दिल्लीच्या प्रवासासाठी सर्व सुविधा देऊन रवाना करण्यात आले आहे .
पुणे : कोल्हापूरहून निघालेली किसान ऋण मुक्ती यात्रा रेल्वे मध्यरात्री पुणे रेल्वे स्टेशनला आली. तिचे जोरदार स्वागत करण्यात आले.
पुणे या ठिकाणी मराठवाड्यातील सर्व शेतकरी कुटुंबियांचे स्वागत करुन दिल्लीच्या प्रवासासाठी सर्व सुविधा देऊन रवाना करण्यात आले आहे . देशातील १८० शेतकरी संघटना एकत्र येऊन. खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली दिल्ली येथे दोन दिवसांच्या धरणे आंदोलनास बसत आहेत. दिल्ली येथे महिलांची प्रतिसंसद भरत आहे . यामध्ये संपूर्ण कर्जमुक्ती व स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करण्यात यावी असा ठराव त्या संसदेत केला जाणार आहे. या महिलांच्या प्रतिसंसदेत देशभरातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या महिला असणार आहेत . या आंदोलनात देशाच्या सर्वच राज्यातील शेतकरी वर्गाचे नेते तथा नेतृत्व सहभागी होत आहेत ज्यामध्ये जोगेंद्र यादव, व्ही एम सिंग , डॉ सुमिलम, आय्या कण्णुर, चंद्रशेखर रेड्डी, मेधा पाटकर, आदी शेतकरी नेते सहभागी होत आहेत . विशेष म्हणजे त्यामध्ये मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबातील महिलांचा सहभाग मोठ्याप्रमाणावर असणार आहे .
या महिला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष माणिक कदम यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीकडे १७ तारखी रवाना झालेल्या आहेत . परभणी जिल्ह्यातील महिलांचे २६ महिलांना एकत्रित घेवून जाण्याचे काम स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवाचे जिल्हाध्यक्ष शेख जाफर व आनंत कदम हे करत आहेत . त्याचबरोबर देवराव हरकळ , उत्तम मैत्रे सर आदी पदाधिकारी देखील सहभागी होत आहेत .
हे धरणे आंदोलन २० व २१ तारखेला असेल . त्यासाठी कोल्हापूरवरुन स्वतंत्र रेल्वे दिल्लीकडे रवाना होत आहे . शेतकरी आंदोलनासाठी प्रथमच संपूर्ण रेल्वे दिल्लीकडे खासदार राजू शेट्टी याच्या नेतृत्वाखाली जात आहे . यात महत्वाची बाब अशी आहे की स्वाभिमानी नावाप्रमाणेच प्रत्येक शेतकऱ्यांने प्रती आडिच हजार रुपये तिकीटास पैसे भरुन हा प्रवास सुरु केला आहे .