सकारात्मक चर्चेनंतर किसान सभेचे आंदोलन मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:11 AM2021-01-25T04:11:21+5:302021-01-25T04:11:21+5:30

बैठकीत किसानसभा जिल्हा अध्यक्ष ॲड नाथा शिंगाडे, जनवादी महिला संघटना राज्य उपाध्यक्ष किरणताई मोघे, जिल्हा सचिव डाॅ.अमोल वाघमारे,सचिव अशोक ...

Kisan Sabha agitation back after positive discussion | सकारात्मक चर्चेनंतर किसान सभेचे आंदोलन मागे

सकारात्मक चर्चेनंतर किसान सभेचे आंदोलन मागे

Next

बैठकीत किसानसभा जिल्हा अध्यक्ष ॲड नाथा शिंगाडे, जनवादी महिला संघटना राज्य उपाध्यक्ष किरणताई मोघे, जिल्हा सचिव डाॅ.अमोल वाघमारे,सचिव अशोक पेकारी,डाॅ. ज्ञानेश्वर मोटे, लक्ष्मी आढारी, नंदा मोरमारे, दत्ता गिरंगे,लक्ष्मण मावळे, जिल्हा आरोग्य आधिकारी डाॅ. भगवान पवार, जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ.अशोक नांदापुरकर, तालुका आरोग्य आधिकारी डाॅ. सुरेश ढेकळे, आदिवासी विकास प्रकल्प निरिक्षक योगेश खंडारे, आदि उपस्थित होते.

यावेळी किसान सभेचे शिष्टमंडळ व मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याबरोबर झालेल्या चर्चेनुसार गरोदर माता व तिचे बाळ यांच्या बाबतचा चौकशी अहवाल प्राप्त झालेनंतर समितीच्या सुचनेनुसार योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे. आदिवासी भागातील असलेले प्राथमिक आरोेग्य केंद्र, भरारी पथके यांची संबंधित ठिकाणी रूग्ण कल्याण समिती व किसान सभेचे पदाधिकारी यांच्याबरोबर दर महिन्याला बैठक बोलावून अडचणींचे निरसन करण्यात येणार आहे. आदिवासी भागातील उपकेंद्रांची स्थिती सुधारावी यासाठी त्वरीत अंमलबजावणी करण्यात येणार आहे. आरोग्य विभागातील रिक्त पदे भरण्यात येणार आहे. आदिवासी भागातील आरोग्य केंद्राच्या ठिकाणी महिन्यातून एक दिवस स्त्री रोग तज्ञ व बाल रोग तज्ञ भेटीचे नियोजन करण्यात येणार आहे. घोडेगाव येथे सोनोग्राफी मशिन उपलब्ध करून देण्याबाबत प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सांगितले.

Web Title: Kisan Sabha agitation back after positive discussion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.