पतंग उडवणे ठरतंय जीवघेणा खेळ; नायलॉनच्या मांजात अडकलेल्या ८४ पक्ष्यांची सुटका

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2023 09:39 AM2023-02-06T09:39:32+5:302023-02-06T09:40:57+5:30

साधा मांजा वापरल्यानंतर तो पक्ष्यांसाठी घातक ठरत नाही. परंतु, बंदी असलेल्या नायलॉन मांजा जीवघेणा ठरत आहे

Kite flying is becoming a deadly sport Rescue of 84 birds trapped in nylon mesh | पतंग उडवणे ठरतंय जीवघेणा खेळ; नायलॉनच्या मांजात अडकलेल्या ८४ पक्ष्यांची सुटका

पतंग उडवणे ठरतंय जीवघेणा खेळ; नायलॉनच्या मांजात अडकलेल्या ८४ पक्ष्यांची सुटका

Next

पुणे : पतंगबाजीचा भरपूर आनंद नुकताच आपण सर्वांनी लुटला. परंतु, या पतंगबाजीत वापरलेल्या नायलॉन मांजामुळे आता पक्ष्यांवर ‘संक्रांत’ आली आहे. शहरात अनेक ठिकाणी नायलॉन मांज्यामध्ये पक्षी अडकत असल्याचे चित्र आहे. मांज्यात अडकल्याने ते जखमी होत आहेत. अशा ८४ पक्ष्यांची सुटका गेल्या पंधरा दिवसांमध्ये पक्षीप्रेमींनी केली आहे. याचवेळी नायलॉन मांजा वापरू नये, याबाबत ते जनजागृतीही करत आहेत.

शहरात वाइल्ड ॲनिमल्स ॲण्ड स्नेक्स प्रोटेक्शन सोसायटी कार्यरत आहे. त्याची स्थापना आनंद तानाजी अडसूळ यांनी केली. त्यांचे सदस्य विविध ठिकाणी असून, ते मांज्यात अडकलेल्या पक्ष्यांची सुटका करत आहेत. त्यामुळे अनेक पक्ष्यांना जीवदान मिळाले आहे. तसेच जखमी झालेल्या पक्ष्यांना कात्रज येथील राजीव गांधी अनाथालयात उपचारासाठी पाठविण्यात येते. ज्या पक्ष्यांना जखम झालेली नाही, त्यांचा मांजा काढून तिथूनच आकाशात मुक्त विहारासाठी सोडण्यात आले.

या अभियानात जय मोरे, लक्ष्मण वाघमारे, मयूर बिबवे, नितीन ताकवले, रवी जगधने, करण वैरागर, सौरभ शिंदे, मयूर दीक्षित, संजय मुदलीयार, अजय बनसोडे, संदेश रसाळ, पंकज मिटकरी, मनोज केळकर, अनिकेत गुजर, शुभम ढवळे, धनंजय कदम, सुमित अडसूळ, राजरत्न गायकवाड, संदेश चौगुले आदींचा सहभाग आहे.
नायलॉन मांज्यावर पोलिस प्रशासनाकडून कारवाई सुरू असली, तरीही अनेकजण त्याचा वापर करत आहेत. काही ठिकाणी लहान मुलांना साधा मांजा वापरा, अशी जनजागृती केली. तेव्हा त्या मुलांनी शपथ घेऊन नायलॉन मांजा वापरणार नाही, असे सांगितले.

साधा मांजा वापरल्यानंतर तो पक्ष्यांसाठी घातक ठरत नाही. परंतु, बंदी असलेल्या नायलॉन मांज्याचा वापर सर्रास दिसून येत आहे. या मांज्याने पक्षी त्यात अडकला की, तो जखमी होतो. त्यामुळे साधा मांजा वापरावा, जेणेकरून तो पक्ष्यांना त्रासदायक ठरणार नाही. - आनंद अडसूळ, वाईल्ड ॲनिमल्स ॲन्ड स्नेक्स प्रोटेक्शन सोसायटी

मांज्यातून जीवदान मिळालेले पक्षी

- ४५ घार
- १५ कावळे
- ९ गव्हाणी घुबड
- १५ पारवे

Web Title: Kite flying is becoming a deadly sport Rescue of 84 birds trapped in nylon mesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.