कात्रजमध्ये दोघांवर कोयत्याने वार करून खुनाचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 18:46 IST2018-04-20T18:46:49+5:302018-04-20T18:46:49+5:30
भाच्याला मारहाण केली म्हणून दोघांवर कोयत्याने वार करून खून करण्याचा प्रयत्न केल्याची घटना कात्रजमध्ये घडली.

कात्रजमध्ये दोघांवर कोयत्याने वार करून खुनाचा प्रयत्न
पुणे : भाच्याला मारहाण केली म्हणून दोघांवर कोयत्याने वार करून खून करण्याचा प्रयत्न केल्याची घटना कात्रजमध्ये घडली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात चौघांविरुध्द खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.
फिर्यादी वैभव पवार (वय २४,रा. फाटे आळी, कात्रज गाव) व ईश्वर निगडे यांच्यावर कोयत्याने वार करण्यात आले आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संजय जगताप याने त्याचा भाचा सुरज किरण मोरे यास फाटे अळीमध्ये राहणा-या सौरभ राजु काटे याने मारहाण केली होती. त्याचा राग मनात धरुन संजय जगताप आपल्या तीन साथीदारांसह तलवारी व कोयत्यासह फाटे अळी चौकामध्ये आला. हत्यारे हातात फिरवत व आरडा-ओरडा करुन त्याने काळ त्या ठिकाणी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, आरोपींनी फिर्यादी पवार व निगडे यांच्यावर कोयत्याने वार केले. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक एस. पी. यादव तपास करत आहेत.