चाकूच्या धाकाने युवकाला लुबाडले
By admin | Published: October 12, 2016 02:15 AM2016-10-12T02:15:25+5:302016-10-12T02:15:25+5:30
पायी जाणाऱ्या युवकाला चाकूचा धाक दाखवून लुबाडणाऱ्या तिघांपैकी दोघांना तातडीने अटक करण्यात मुंढवा पोलिसांना यश आले़ घोरपडी येथील रेल्वे गेट
पुणे : पायी जाणाऱ्या युवकाला चाकूचा धाक दाखवून लुबाडणाऱ्या तिघांपैकी दोघांना तातडीने अटक करण्यात मुंढवा पोलिसांना यश आले़ घोरपडी येथील रेल्वे गेट बंद असल्याने त्यांचा शोध घेत असलेल्या पेट्रोलिंगवरील पथकाचा हाती ते लागले़
अक्षय विजय पवार (वय १९, रा़ पांडवनगर, पाषाण) आणि ऋषीकेश सुनिल बागुल (वय १९, रा़ कामगार पुतळा, शिवाजीनगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत़ ही घटना मुंढवा येथील पासपोर्ट कार्यालयाच्या पार्किंगजवळ मंगळवारी मध्यरात्री सव्वाबारा वाजता घडला़ याप्रकरणी मुकेशसिंग भोरा (वय १९, रा़ मुंढवा) यांनी फिर्याद दिली आहे़
मुकेशसिंग हे आपले काम संपून पायी घरी जात होते़ त्यावेळी मोटारसायकलवरुन तिघे जण तेथे आले़ त्यांनी चाकूला धाक दाखवून त्यांच्याकडील १ हजार रुपये व मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेऊन ते पसार झाले़ त्यानंतर मुकेशसिंग हे काही अंतरावर आल्यावर त्यांना पोलिसांची पेट्रोलिंग गाडी दिसली़ त्यांनी झालेला प्रकार त्यांना सांगितला़ पोलिसांनी त्यांनाबरोबर घेऊन आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली़ ते घोरपडी येथील रेल्वे गेटजवळ आले़ पोलिसांची गाडी पाहून तिघांपैकी पप्पु थोरात हा पळून गेला़ दोघांना पोलिसांनी अटक केली आहे़ याबाबत सहायक पोलीस निरीक्षक बी़ एस़ ढवळे यांनी सांगितले की, पप्पू थोरात याचा काल वाढदिवस असल्याने त्याने या दोघांना बोलविले होते़ त्यानंतर येरवडा येथून मुंढव्याला आले़ त्यावेळी त्यांनी या युवकाला लुबाडले़ पप्पु थोरात याचा शोध घेत असून न्यायालयाने दोघांना १३ आॅक्टोंबरपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे़ (प्रतिनिधी)