जाणून घेतली ग्राउंड रिअॅलिटी
By Admin | Published: October 17, 2014 12:08 AM2014-10-17T00:08:47+5:302014-10-17T00:08:47+5:30
पुण्यातील एका कार्यक्रमासाठी आले असताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अचानक काँग्रेस भवनला भेट देऊन प्रत्यक्ष उमेदवारांकडून ग्राउंड रिअॅलिटी जाणून घेतली़
पुणो : पुण्यातील एका कार्यक्रमासाठी आले असताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अचानक काँग्रेस भवनला भेट देऊन प्रत्यक्ष उमेदवारांकडून ग्राउंड रिअॅलिटी जाणून घेतली़ जिल्ह्यात आणि शहरात प्रत्येकी एक जागा वाढून पुण्यात काँग्रेसला 6 तरी जागा मिळतील, असे त्यांना सांगण्यात आल़े
पुण्यातील कार्यक्रमात आल्यानंतर एक तासाभराचा वेळ असल्याने आपण उमेदवारांना भेटण्यासाठी काँग्रेस भवनला आल्याचे चव्हाण यांनी सांगितल़े
जिल्हा काँग्रेस अध्यक्ष देवीदास भन्साळी, शहर काँग्रेसचे प्रभारी अध्यक्ष संजय बालगुडे, आमदार विनायक निम्हण, अॅड़ अभय छाजेड, अॅड़ चंद्रकांत छाजेड, रोहित टिळक, उमेश कंधारे, बाळासाहेब शिवरकर, श्रीरंग चव्हाण यांच्याशी चव्हाण यांनी एकांतात वैयक्तिक चर्चा करून मतदारसंघात कशी परिस्थिती होती, कशी लढत दिली, किती मतदान झाले, कोणी विरोधात काम केले का याबाबत चौकशी केली़ प्रत्येकाशी वैयक्तिक चर्चा करताना त्यांनी काही जणांना आपल्याला तुमच्या मतदारसंघाचा रिपार्ट आला असून, तुम्ही चांगली लढत दिली असल्याचेही सांगितल़े
पुणो जिल्ह्यात मागील वेळी आपल्याला 2 जागा होत्या. त्यात आणखी एका जागेची वाढ होण्याची शक्यता आह़े आपल्या उमेदवाराची अडचणी झाली, तर ती राष्ट्रवादी काँग्रेसलाच होणार असल्याचे त्यांना सांगण्यात आल़े (प्रतिनिधी)
एक मुख्यमंत्रिपदावर राहिलेली व्यक्ती निवडणुकीनंतर काँग्रेस भवनात येऊन उमेदवारांना भेटून मतदानाविषयी जाणून घेतेय, हे मी पहिल्यांदाच अनुभवलं़ जिल्ह्यात आम्ही आमच्या दोन जागा टिकविणार असून, आणखी एक जागा मिळविणार आह़े काँग्रेसच्या उमेदवाराचा राष्ट्रवादी काँग्रेसला जास्त त्रस झाला असणार, असे आपण त्यांना सांगितल़े - देवीदास भन्साळी,
जिल्हा काँग्रेस अध्यक्ष
पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्याशी 1क् मिनिटे चर्चा केली़ कोथरूडमधील काँग्रेसची परंपरागत मते, मुळशीची मते, पूरग्रस्तांची मते, मित्र परिवार, ब्लॉक काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून असलेला संपर्काचा फायदा मिळणार असल्याचे सांगितल़े त्यावर चव्हाण यांनी तुम्ही चांगली लढत दिल्याचा रिपोर्ट आपल्याकडे आला असल्याचे सांगितल़े
- उमेश कंधारे
यंदा अधिक जागा..
पुणो शहरातील शिवाजीनगर, कॅन्टोन्मेंट हे दोन्ही मतदारसंघ आपल्याकडे आहेच. त्यात आणखी एका मतदारसंघाची वाढ होईल़ काँग्रेसच्या परंपरागत मतात यंदा वाढ होण्याची शक्यता आह़े आघाडी असतानाही जेवढय़ा जागा काँग्रेसला मिळाल्या, त्यापेक्षा अधिक जागा यंदा मिळणार असल्याचे त्यांना सांगण्यात आल़े