जाणून घ्या अापल्या अायुष्यातील हास्याचे महत्त्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2018 09:16 PM2018-05-05T21:16:41+5:302018-05-05T21:16:41+5:30
दर वर्षी 6 मे राेजी जागतिक हास्यदिन साजरा केला जाताे. सध्याच्या धकाधकीच्या अायुष्यात हसणे अापण कुठेतरी हरवून बसलाे अाहाेत. त्यामुळे हास्याचे अापल्या अायुष्यातील महत्त्व काय हे अापण एकदा जाणून घेऊयात.
पुणे : 6 मे हा जागतिक हास्यदिन म्हणून साजरा केला जाताे. सध्याच्या धकाधकीच्या अायुष्यात अापले हास्य कुठेतरी कमी झाले अाहे. राेजच्या ताणतणावात हास्याला अाता जागा उरलेली नाही. माेबाईल, संगणक युगात अापण कृत्रिम हाेत चाललाे अाहाेत. 80 टक्के अाजारांचे मूळ हे मानसिक ताणतणाव यांमध्ये अाहे. मानसिक ताणतणाव कमी हाेण्यासाठी हास्य उपयाेगी पडते. जागतिक हास्य दिनानिमित्त जाणून घेऊया अापल्या अायुष्यातील हास्याचे महत्त्व
1) तीन वर्षाचे मूल दिवसातून तीनशे वेळा हसत असते. अापले वय वाढते तसे हसणे कमी व्हायला लागते. सरासरी एक माेठी व्यक्ती दिवसात सुमारे तेराच वेळा हसते. त्यामुळे निराेगी अायुष्यासाठी राेज जास्तीत जास्त हसायला हवे.
2) साधारण 80 टक्के अाजारांचे मूळ हे मानसिक ताणतणावात अाहे. या ताणतणावामुळे अापल्या चेहऱ्यावरील हास्यच अापण हरवून बसलाे अाहाेत. अापल्याला अालेला मानसिक तणाव दूर करण्यासाठी हास्य खूप उपयाेगी पडते. हसल्याने फ्रेश वाटते व अापला तणाव दूर हाेताे. अापल्याला उत्साही वाटते. तसेच अापण अापल्या कामावर लक्ष केंद्रीत करु शकताे.
3) राेज अायुष्यात हास्याचे याेग फारसे येत नसतील तरी व्यायाम म्हणून तरी प्रत्येकाने राेज हसायला हवे. या व्यायामाच्या हसण्यासाठी अनेक हास्ययाेग ग्रुप स्थापन केलेले पाहायला मिळतात. जेथे नागरिक एकत्र येत हसण्याचे व्यायाम करतात.
4) हसणे हे एक प्रकारचे विज्ञान असून त्याला जेलाेटाेलाेजी असे म्हणतात.
5) हसण्यासाठी अापल्या शरीरातील 17 स्नायुंचा वापर हाेत असताे. तर रागावण्यासाठी 43 स्नायुंचा वापर हाेताे. त्यामुळे रागात अापण अापली जास्त शक्ती खर्ची घालत असताे. तसेच त्यातून मानसिक शांताताही भंग हाेत असते. त्यामुळे जास्त राग न येऊ देता, जास्तीत जास्त हासायला हवे.
6) हसण्यामुळे अापल्या शरीरालाही माेठा फायदा हाेत असताे. हसण्याने रक्ताभिसरण चांगले हाेते. तसेच रक्तदाबही कमी हाेताे. त्यामुळे ज्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास अाहे त्यांनी राेज हसले पाहिजे.
7) हास्याचा अापला अायुष्यातील सर्वात माेठा फायदा म्हणजे हसणाऱ्या व्यक्तीचे अायुर्मान वाढते. सतत हसत राहिल्याने अापल्या चेहऱ्यावर अात्मविश्वास दिसून येताे. याचा परिणाम अापल्या कामावरही हाेत असताे. त्याचबराेबर हास्याने श्वसनसंस्था, स्नायूसंस्था यांनाही फायदा हाेत असताे.
त्यामुळे केवळ हास्यदिनीच नाही तर अापल्या राेजच्या अायुष्यामध्ये अापण नेहमीच हसत राहायला हवे.