स्वतःला ओळखणे, संवाद कौशल्य महत्त्वाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:08 AM2021-07-01T04:08:22+5:302021-07-01T04:08:22+5:30

स्वतःला ओळखणे, संवाद कौशल्य महत्त्वाचे अभिजित कोळपे स्वतःला ओळखणे तसेच संवाद कौशल्य वाढवण्यासाठी सातत्याने शब्दसंग्रह वाढवल्यास सामान्य अध्ययन, वैकल्पिक ...

Knowing yourself, communication skills are important | स्वतःला ओळखणे, संवाद कौशल्य महत्त्वाचे

स्वतःला ओळखणे, संवाद कौशल्य महत्त्वाचे

googlenewsNext

स्वतःला ओळखणे, संवाद कौशल्य महत्त्वाचे

अभिजित कोळपे

स्वतःला ओळखणे तसेच संवाद कौशल्य वाढवण्यासाठी सातत्याने शब्दसंग्रह वाढवल्यास सामान्य अध्ययन, वैकल्पिक विषयांबरोबर निबंध या विषयांचे पेपर लिहिताना चांगला फायदा होतो. एखाद्या विषयावर कमीत कमी कालावधीत जास्तीत जास्त बोलता येणे, हे ज्ञानाबरोबरच उत्कृष्ट संवाद कौशल्याचे लक्षण आहे. ते जास्त परिणामकारक ठरते. त्यामुळे संवाद कौशल्य, पेपर सोडवण्याचा सातत्याने सराव केल्यास केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेत हमखास यश मिळू शकते, असा विश्वास विद्यार्थ्यांना तामिळनाडू राज्याचे अतिरिक्त सचिव (फायनान्स) प्रशांत वडणेरे देतात. वडणेरे यांनी करूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, स्टेट फायनान्स कमिशनचे प्रतिनिधी सचिव तसेच राज्याच्या अर्थखात्याचे उपसचिव म्हणून काम पाहिले आहे.

प्रशांत वडणेरे हे मूळचे महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील ताहराबादचे. वडिलांचे अकाली निधन झाल्याने सर्व जबाबदारी त्यांच्या आईने पार पाडली. रोजगार आणि तीन मुलांच्या शिक्षणासाठी त्या पुण्यात आल्या. त्यामुळे प्रशांत यांचे संपूर्ण शिक्षण पुणे शहरात झाले. महात्मा फुले कृषी विद्यापीठातून बीएससी कृषी या विषयात त्यांनी पदवी घेतली. पदवीच्या शेवटच्या वर्षात त्यांनी यूपीएससीच्या तयारीला सुरुवात केली. जिद्द, फोकस पद्धतीने अभ्यास आणि चिकाटीच्या जोरावर केवळ दुसऱ्याच प्रयत्नात त्यांनी यूपीएससीत यश मिळवले आहे.

पूर्व परीक्षेपूर्वी तीन महिने आधी सामान्य अध्ययन, सी-सॅट या पेपरचे मागील किमान पाच ते आठ वर्षांतील प्रश्नपत्रिकांचा तुलनात्मक अभ्यास करावा. कोणत्या विषयाला जास्त आणि कोणत्या विषयाला कमी महत्त्व दिले आहे. प्रश्न विचारण्याचा ट्रेंड लक्षात घ्यावा. त्यामुळे परीक्षेचा आवाका आपल्याला येतो.

मुख्य परीक्षेची तयारी करताना पूर्व परीक्षेसारखाच सर्व पेपरच्या प्रश्नपत्रिकांचा तुलनात्मक अभ्यास गरजेचा आहे. मुख्यतः वैकल्पिक विषयाचे दोन पेपर आणि सामान्य अध्ययनच्या चार पेपरवर पूर्ण फोकस करावा. कारण या सहा पेपरमधून मिळणाऱ्या गुणांमुळे यूपीएससीचे भवितव्य जास्त अवलंबून आहे. या सर्व पेपरचा बेसिक अभ्यास National Council Education Research Training म्हणजे एनसीईआरटीची इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतची पुस्तके जास्तीत जास्त वेळा अभ्यासावी. कारण यूपीएससी परीक्षेचा मूळ बेस या अभ्यासक्रमावर आधारित आहे.

मुलाखतीला जाण्यापूर्वी स्वतःबद्दलची माहिती एकदा अपडेट करावी. छंद, आवडी-निवडी याविषयी ऐनवेळी बदल करून सांगू नये. जे आहेत तेच सांगावे. पॅनलनी खोलात जाऊन प्रश्न विचारल्यास अडचणीचे ठरते. त्यामुळे ऐनवेळी दुसराच छंद सांगितला आणि त्याचे आपल्याला ज्ञान कमी असल्यास धोक्याचे ठरू शकते. त्याचबरोबर आपण जी माहिती देणार आहोत ती समोरच्याला समजेल अशा भाषेत असावी. त्यामुळे संवाद कौशल्य महत्त्वाचे आहे. तसेच कठीण काळात, तणावाच्या परिस्थितीत आपण कसे वागतो, कसे निर्णय घेतो, आपल्या शरीराच्या हालचाली याचे निरीक्षण पॅनलचे सदस्य घेत असतात.

फोटो : प्रशांत वडणेरे

Web Title: Knowing yourself, communication skills are important

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.