भक्तिसाधनेला हवी ज्ञानाची जोड
By admin | Published: May 11, 2017 04:59 AM2017-05-11T04:59:09+5:302017-05-11T04:59:09+5:30
भगवंताला सर्वस्व अर्पण करणाऱ्या भक्तीचे प्रेम हे निरपेक्ष असते. हल्ली स्वार्थापोटी, संकटकाळी आपण परमेश्वराची प्रार्थना करतो.
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : भगवंताला सर्वस्व अर्पण करणाऱ्या भक्तीचे प्रेम हे निरपेक्ष असते. हल्ली स्वार्थापोटी, संकटकाळी आपण परमेश्वराची प्रार्थना करतो. त्या वेळी भगवंताच्या नामाचा जप करतो, श्लोक म्हणतो, अध्यायाचे पठण करतो; परंतु त्याचा अर्थ समजून घेत नाही. केवळ रामनामाचा जप करणे म्हणजे भक्ती नाही. त्या भक्तिसाधनेला ज्ञानाची जोड असणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन ग्वाल्हेरचे समर्थ भक्त परायण उपेंद्रमहाराज शिरगावकर यांनी केले.
सदाशिव पेठेतील श्री नारद विद्यामंदिर येथे समर्थ भक्त परायण उपेंद्रमहाराज शिरगावकर (ग्वाल्हेर) यांचे कीर्तन झाले. हभप रामचंद्रबुवा भिडे आणि हभप रामचंद्रबुवा गोऱ्हे या वेळी उपस्थित होते. मिलिंद तायवाडे (तबला) आणि बापू सुतार (हार्मोनियम) यांनी साथसंगत
केली.