कोलतावडेत बायोगॅस प्रकल्प

By admin | Published: July 20, 2015 04:08 AM2015-07-20T04:08:10+5:302015-07-20T04:08:10+5:30

केंद्र शासनाच्या वीसकलमी कार्यक्रमाअंतर्गत अपारंपरिक ऊर्जा बळकटीकरण योजनेतून निरगुडसर पुनर्वसित कोलतावडे या ठिकाणी वीस बायोगॅस

Kolavadet biogas project | कोलतावडेत बायोगॅस प्रकल्प

कोलतावडेत बायोगॅस प्रकल्प

Next

निरगुडसर : केंद्र शासनाच्या वीसकलमी कार्यक्रमाअंतर्गत अपारंपरिक ऊर्जा बळकटीकरण योजनेतून निरगुडसर पुनर्वसित कोलतावडे या ठिकाणी वीस बायोगॅस प्रकल्प व २० स्वच्छतागृहे असा एकत्रित बायोगॅस प्रकल्प तयार करण्यात आल्याची माहिती
उपसरपंच रामदास वळसे-पाटील यांनी दिली़
या योजनेअंतर्गत लाभार्थ्यास महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्याकडून १२ हजार २०० रुपये अनुदान मिळत आहे. स्वच्छ भारत मिशन अभियानाअंतर्गत १२०० रुपये व जिल्हा परिषद समाजकल्याण विभाग यांच्याकडून ११ हजार रुपये अनुदान मिळत आहे़ असे एकूण ३५ हजार २०० रुपये अनुदान मिळत आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्रामपंचायतीशी संपर्क साधण्याचे आवाहन आंबेगाव तालुका पंचायत समितीचे विस्तार अधिकारी आऱ आऱ मैड व ग्रामविस्तार अधिकरी ए़ एस़ कांबळे यांनी केले आहे़
निरगुडसर या ठिकाणी डिंभे धरण प्रकल्पातून पुनर्वसन झालेल्या आदिवासी कोलतावडे गावठाणात हा प्रकल्प सामूहिक पद्धतीने राबविण्यात आला आहे़ जनावरांच्या मलमूत्रापासून व मानवी मलमूत्रापासून, गोबर गॅस व शौचालय यापासून एकत्रित हा प्रकल्प असून एका कुटुंबातील किमान आठ माणसांचा स्वयंपाक तयार होऊन गॅस शिल्लक राहत असल्याचे हौसाबाई शेळके या गृहिणीने सांगितले़
या वेळी प्रगतिशील शेतकरी राहुल हांडे़, सीताराम किर्वे, ग्रामपंचायत सदस्य लीला शेळके भाऊसाहेब वळसे व ग्रामस्थ
उपस्थित होते़ (वार्ताहर)

Web Title: Kolavadet biogas project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.