कोंढापुरी तलाव कोरडा

By Admin | Published: May 31, 2016 02:06 AM2016-05-31T02:06:49+5:302016-05-31T02:06:49+5:30

कोंढापुरी (ता. शिरूर) येथील तलावातील पाणी संपुष्टात आले आहे. या तलावावर अवलंबून असणारी रांजणगाव गणपती ग्रामपंचायतीची सुमारे २० कोटी रुपये खर्चाची पाणीपुरवठा योजना पूर्णपणे

Kondapuri pond dry | कोंढापुरी तलाव कोरडा

कोंढापुरी तलाव कोरडा

googlenewsNext

रांजणगाव गणपती : कोंढापुरी (ता. शिरूर) येथील तलावातील पाणी संपुष्टात आले आहे. या तलावावर अवलंबून असणारी रांजणगाव गणपती ग्रामपंचायतीची सुमारे २० कोटी रुपये खर्चाची पाणीपुरवठा योजना पूर्णपणे ठप्प झाल्याने ग्रामस्थांना ऐन उन्हाळ्याच्या शेवटच्या दिवसांमध्ये पाणीटंचाईला सामोरे जाण्याची वेळ आली आहे.
खेड तालुक्यातील थिगळस्थळ येथे चासकमानच्या डाव्या कालव्याला मोठे भगदाड पडल्याने चालू महिन्याच्या सुरुवातीला सोडलेल्या पाण्याच्या आवर्तनाचे लाखो लिटर पाणी ऐन दुष्काळी परिस्थितीत वाया गेल्यानेच ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मानसिंग पाचुंदकर यांनी केला आहे. याला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यावर शासनाने कारवाई करावी, अशी मागणीही पाचुंदकर यांनी केली आहे.
सध्या दुष्काळी परिस्थितीने सर्वसामान्य नागरिकांबरोबरच शेतकरी होरपळत असताना असे बेजबाबदार कृत्य करणाऱ्यांना चांगला धडा शिकविणे गरजेचे असल्याचेही पाचुंदकर यांनी म्हटले आहे. रांजणगाव गणपतीसह परिसरातील ७ ते ८ गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कोंढापुरी तलावावर अवलंबून आहे.
या तळ्यातील पाणीसाठा शेवटच्या घटका मोजत असल्याने चासकमानचे पाणी तलावात सोडण्याची मागणी यापूर्वीच केलेली होती. मात्र, पाण्याच्या प्रवाहाचा अत्यल्प दाब आणि चासकमानच्या अधिकाऱ्यांसह शासनाचे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने आज रांजणगावसह परिसरातील ६ ते ७ गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
अशा खोडसाळ प्रवृत्तीचा बीमोड करण्यासाठी संबंधितांवर गुन्हे दाखल करून कडक कारवाई प्रशासनाने करावी, अशी मागणी पाचुंदकर यांनी केली होती.
परंतु, प्रशासनाने त्या निवेदनाची कोणतीही दखल घेतली नसल्याने आज रांजणगावकरांना पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. रांजणगावची स्थायी व अस्थायी मिळून मोठी लोकस्ांख्या असून पाणीप्रश्न बिकट बनला आहे. , दिवसाआड नागरिकांना पाणी देण्याचा प्रयत्न ग्रामपंचायतीकडून केला जात आहे.
त्यामुळे परिसरातील गावात पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. नागरिकांची पाण्यासाठी भटकंती होत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.(वार्ताहर)

Web Title: Kondapuri pond dry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.