टेम्पोचालकाचे दोन्ही पाय फ्रॅक्चर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2018 01:22 AM2018-08-15T01:22:23+5:302018-08-15T01:22:38+5:30

आज दुपारी दोन वाजता कात्रज-कोंढवा रस्ता येथे बस टेम्पो व व्हॅनच्या झालेल्या भीषण अपघातात सुदैवाने चालक बचावल्याची घटना घडली. रस्त्यावर उतारावरून बसने टेम्पोला व पुढे असणाऱ्या व्हॅनला टेम्पोने धडक दिल्याने टेम्पोचालक त्या टेम्पोमध्येच अडकला होता.

kondhava Accident news | टेम्पोचालकाचे दोन्ही पाय फ्रॅक्चर

टेम्पोचालकाचे दोन्ही पाय फ्रॅक्चर

googlenewsNext

कोंढवा - आज दुपारी दोन वाजता कात्रज-कोंढवा रस्ता येथे बस टेम्पो व व्हॅनच्या झालेल्या भीषण अपघातात सुदैवाने चालक बचावल्याची घटना घडली. रस्त्यावर उतारावरून बसने टेम्पोला व पुढे असणाऱ्या व्हॅनला टेम्पोने धडक दिल्याने टेम्पोचालक त्या टेम्पोमध्येच अडकला होता. तेथील नागरिकांनी अग्निशमन दलाला याबाबत माहिती दिल्यानंतर कोंढवा बुद्रुक अग्निशमन केंद्राचे जवान व क्विक रिस्पॉन्स टीमचे वाहन घटनास्थळी तातडीने दाखल झाले. हडपसर-कात्रज या बस क्र. २९१ चे ब्रेक निकामी झाल्याने बसने तीन गाड्यांना धडक दिली. यात
टेम्पोचालकाचे दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले.
कात्रजकडून हडपसरकडे जाणारी बस क्र. २९१ ही बस टिळेकरनगर येथे बसचे ब्रेक निकामी झाल्याने बसने प्रथम चारचाकीला (एमएच १४, जीयू, ४१६२) ठोकर मारली. चारचाकी बाजूला गेल्यावर बसने टेम्पोला (एमएच १२, एफडी ८९८) धडक दिली. टेम्पोने ओमनी या गाडीला मागून धडक दिली.
या तिहेरी अपघातात टेम्पोचालक महादेव तुकाराम रेणूसे (वय ४०) टेम्पोत अडकून बसला. मग अग्निशमन दलाला पाचारण केले व रेणूसे यांना बाहेर काढले.

१ जवानांनी प्रथम टेम्पोचालकाची परिस्थिती पाहून पुढील बचावकार्यास सुरुवात केली. जवानांनी त्या तीनचाकी टेम्पोमधील चालकाशी संभाषण चालू ठेवत त्याची लवकरच सुटका करीत असल्याचे सांगितले. दलाकडील कटर, स्प्रेडरचा वापर करून शक्कल लढवत अवघ्या पंधरा वीस मिनिटात चालकास जखमी अवस्थेत बाहेर काढून रुग्णवाहिकेतून रुग्णालयात रवाना केले.

२ टेम्पोचालकाच्या कंबरे खालील भागाला गंभीर दुखापत झाल्याचे तसेच टेम्पो व व्हॅनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे नागरिकांनी सांगितले. बसच्या पुढील भागाच्या काचा फुटल्या असून बसमधे प्रवासी असल्याने सुदैवाने मोठा अपघात टळल्याची चर्चा प्रथमदर्शनी नागरिकांमध्ये होती. नेमका अपघात कसा झाला, याचा तपास पोलीस करीत आहेत.

३ टेम्पोचालकाला तत्परतेने बाहेर काढण्यामध्ये कोंढवा बुद्रुक अग्निशमन केंद्राचे तांडेल सुभाष जाधव व वाहनचालक सुखदेव गोगावले तसेच जवान विशाल यादव, संदीप पवार व क्विक रिस्पॉन्स टीमचे राहुल जाधव, ओंकार ताटे, अविनाश लांडे यांनी सहभाग घेतला.

Web Title: kondhava Accident news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.