कोंढवळ-निगडाळेला पंतप्रधान महाआवाज योजनेचा पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:22 AM2021-09-02T04:22:18+5:302021-09-02T04:22:18+5:30
पुरस्कार वितरण सोहळा पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या वेळी जिल्हा ...
पुरस्कार वितरण सोहळा पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या वेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, उपाध्यक्ष रणजित शिवतारे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांतील सर्व जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व पंचायत समिती सभापती, गटविकास अधिकारी उपस्थित होते.
ग्रुप ग्रामपंचायत कोंढवळ यांच्या वतीने प्रशस्तिपत्रक, ट्रॉफी ग्रामसेवक अशोक शेवाळे, सरपंच दीपक चिमटे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या वेळी आंबेगाव पंचायत समिती विस्तार अधिकारी सुनील भोईर, ग्रामपंचायत सदस्य दत्ता लोहकरे, पोलीस पाटील सुभाष कारोटे, तंटामुक्ती अध्यक्ष अशोक जोशी, पेसा समिती अध्यक्ष एकनाथ कवटे, जितेंद्र गायकवाड उपस्थित होते.
ग्रुप ग्रामपंचायत कोंढवळने महाआवास योजनेचे प्रभावी काम केले आहे. पुरस्कार मिळाल्याबद्दल गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, माजी समाजकल्याण सभापती सुभाष मोरमारे, पंचायत समिती आंबेगावचे सभापती संजय गवारी, जिल्हा परिषद सदस्या रुपालीताई जगदाळे, गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी उपाध्यक्ष मारुतीरावजी लोहकरे यांनी ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवक व सर्व सदस्यांचे अभिनंदन आणि ग्रामस्थांनी विशेष सहकार्य केल्याबद्दल आभार व्यक्त केले आहे.
फोटो ; कोंढवळ-निगडाळे (ता. आंबेगाव) ग्रामपंचायतीस महाआवास योजनेचा राज्यस्तरीय तृतीय पुरस्कार विधानभवन (पुणे) येथे प्रदान करताना विभागीय आयुक्त सौरभ राव.