कोंडवाड्याचे उद्घाटन जनावरे मोकाटच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:33 AM2021-02-20T04:33:01+5:302021-02-20T04:33:01+5:30
गेल्या चार वर्षांपासून कॅन्टोन्मेंट प्रशासनाकडे कोंडवाडा नसल्याने या भागात मोकाट व व उपद्रव करणाऱ्या मोकाट जनावरांचा वावर जास्तच वाढला ...
गेल्या चार वर्षांपासून कॅन्टोन्मेंट प्रशासनाकडे कोंडवाडा नसल्याने या भागात मोकाट व व उपद्रव करणाऱ्या मोकाट जनावरांचा वावर जास्तच वाढला होता. त्यामुळे येथील बाबजान चौक, बाटा चौक, कोहिनूर चौक, भोपळे चौक, पुलगेट बस स्टँड, आणि इतर चौकामध्ये मोठ्या प्रमाणात भटकी, मोकाट जनावरे बसायची. त्यामुळे रहादरीच्या मोठ्या समस्या निर्माण होत असत. तसेच नागरी वस्त्या, भाजी मंडई या ठिकाणी देखील या जनावरांचा संचार अधिक असल्याने अनेक नागरिकांना यामुळे इजादेखील झाली होती.
परंतु गेल्या १० फेब्रुवारीलाच मा. नगरसेवक गायकवाड यांनी प्रशासनाकडून कोंडवाड्याची निर्मिती करून त्याचे लोकार्पणही केले होते, परंतु सध्या कॅन्टोन्मेंट प्रशासनाकडून मोकाट जनावरांना पकडण्याची प्रक्रियेला सुरुवात झालेली दिसत नाही. त्यामुळे कोंडवाडा उद्घाटन होऊनही कार्यान्वित झालेला दिसत नाही, त्यामुळे सध्यातरी नागरिकांच्या अडचणी जैसे थे तैसेंच अशी परिस्थिती दिसून येत आहे
निहाल कदम (स्थानिक)- उद्घाटन होऊनही यंत्रणा कार्यान्वित नसणे हे दुर्दैवी असून कॅन्टोन्मेंट प्रशासनाने नागरिकांच्या जिवाशी खेळू नये.
रियाझ शेख, अतिक्रमण विभागप्रमुख