Weather Alert : कोकण, पश्चिम महाराष्ट्राला पुन्हा पावसाचा धोका; 'या' जिल्ह्यांना ३०, ३१ जुलैला 'ऑरेंज' अलर्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2021 09:06 PM2021-07-27T21:06:00+5:302021-07-27T21:09:16+5:30

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. येत्या २४ तासात ते आणखी तीव्र होणार

Konkan, Western Maharashtra at risk of rains again; 'Orange' alert to these districts on July 30, 31 | Weather Alert : कोकण, पश्चिम महाराष्ट्राला पुन्हा पावसाचा धोका; 'या' जिल्ह्यांना ३०, ३१ जुलैला 'ऑरेंज' अलर्ट

Weather Alert : कोकण, पश्चिम महाराष्ट्राला पुन्हा पावसाचा धोका; 'या' जिल्ह्यांना ३०, ३१ जुलैला 'ऑरेंज' अलर्ट

Next

पुणे : गेल्या काही दिवसांपासून कोकण, पश्चिम महाराष्ट्राला जोरदार तडाखा दिल्यानंतर आता पावसाचा जोर कमी झाला असला तरी येत्या ३० व ३१ जुलै रोजी हवामान विभागाने कोकणासह पश्चिम महाराष्ट्राला ऑरेंज अलर्ट दिला आहे. त्यामुळे पावसाचा पुन्हा धोका वाढला आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. येत्या २४ तासात ते आणखी तीव्र होणार आहे. त्यामुळे पश्चिम बंगाल, झारखंड येथे जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पश्चिम किनारपट्टीवरील वार्‍यांचा वेग वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात ३० व ३१ जुलै रोजी तुरळक ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच कोल्हापूर, सातारा, पुणे जिल्ह्यातील घाट परिसरात तुरळक ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 

गेल्या २४ तासात मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. कोकण गोव्यात बहुतांश ठिकाणी, विदर्भ व मध्य महाराष्ट्रात बर्‍याच ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. कोकणात बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडला़ मध्य महाराष्ट्रात महाबळेश्वर ९०, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर ७०, राधानगरी ६०, इगतपुरी, वेल्हे ५० मिमी पावसाची नोंद झाली होती. तसेच अनेक ठिकाणी मध्यम ते हलका पाऊस पडला.

बुधवारी कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. २९ जुलै रोजी कोकणातील किनारपट्टीलगत सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. 

३० व ३१ जुलै रोजी कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

Web Title: Konkan, Western Maharashtra at risk of rains again; 'Orange' alert to these districts on July 30, 31

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.