रसिकांसाठी कोरियन चित्रपटांची मेजवानी; ९, १० नोव्हेंबरला पुण्यात महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2017 06:44 PM2017-11-06T18:44:32+5:302017-11-06T18:51:46+5:30

Korean film festival for lovers; Festival in Pune on November 9, 10 | रसिकांसाठी कोरियन चित्रपटांची मेजवानी; ९, १० नोव्हेंबरला पुण्यात महोत्सव

रसिकांसाठी कोरियन चित्रपटांची मेजवानी; ९, १० नोव्हेंबरला पुण्यात महोत्सव

googlenewsNext
ठळक मुद्देराष्ट्रीय चित्रपट संग्रहालयामध्ये दोन दिवसीय कोरियन चित्रपट महोत्सवाचे आयोजन‘द थाईव्हज’, ‘द फ्रंट लाईन’, ‘द सस्पेक्ट’, ‘कुंडो : एज आॅफ द रँपंट’ आदी चित्रपट दाखवले जाणार

पुणे : आदानप्रदानातून कला अधिकाधिक समृद्ध होत असते. सांस्कृतिक आदानप्रदानाला बळकटी मिळावी आणि नवी दालने खुली व्हावीत, या उद्देशाने राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयामध्ये दोन दिवसीय कोरियन चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ९ आणि १० नोव्हेंबर रोजी रसिकांना कोरियन चित्रपटांचा आस्वाद घेता येणार आहे.
सामाजिक घडामोडी, इतिहास असे विविध विषयांवर टिपण्णी करणारे ‘द थाईव्हज’, ‘द फ्रंट लाईन’, ‘द सस्पेक्ट’, ‘कुंडो : एज आॅफ द रँपंट’ आदी कोरियन चित्रपट महोत्सवात दाखवले जाणार आहेत, अशी माहिती मुंबईतील काऊन्सलेट जनरल आॅफ रिपब्लिक आॅफ कोरियाचे वाणिज्य दूत केनेथ बिन यांनी पत्रकार परिषदेत दिली. हे चित्रपट ९ आणि १० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ आणि ७.३० वाजता दाखवले जाणार आहेत.
बिन म्हणाले, ‘दोन देशांच्या संस्कृतींमधील आदानप्रदान खूप महत्वाचे असते. कोरियन चित्रपटसृष्टीचा आवाका मर्यादित असला तरी नवनवीन विषय हाताळण्याचा दिग्दर्शकांचा प्रयत्न कायम असतो. दर वर्षी साधारपणे १५० चित्रपटांची निर्मिती होते. हे चित्रपट पाहण्याची संधी येथील रसिकांना महोत्सवाच्या निमित्ताने उपलब्ध झाली आहे. हे चित्रपट साधारणपणे १३३ ते १४० मिनिटांचे आहेत. यातून रसिकांना नवीन विषयांचा आस्वाद घेता येऊ शकतो. पुढील वर्षीच्या महोत्सवामध्ये चित्रपटाचे दिग्दर्शक, कलाकार यांच्याशी संवाद साधता यावा, यासाठी प्रयत्न सुरु आहेत.’
कोरियन चित्रपटप्रेमींना हिंदी चित्रसृष्टीचे आकर्षण असून, ‘थ्री इडियटस’, ‘माय नेम इज खान’, ‘पीके’, ‘दंगल’ या हिंदी चित्रपटांना कोरियामध्ये चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे बिन यांनी सांगितले.
 

Web Title: Korean film festival for lovers; Festival in Pune on November 9, 10

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.