Koregaon Bhima Inquiry Commission: गरज पडल्यास मुख्यमंत्र्यांना चौकशीसाठी बोलावू : आयोग
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2018 02:37 PM2018-11-13T14:37:48+5:302018-11-13T14:38:19+5:30
चौकशी आयोगाला वाटलं आणि गरज पडल्यास मुख्यमंत्र्यांपासून कुठल्याही मंत्र्यांना चौकशीसाठी बोलावण्यात येईल...
पुणे : चौकशी आयोगाला वाटलं आणि गरज पडल्यास मुख्यमंत्र्यांपासून कुठल्याही मंत्र्यांना चौकाशीसाठी बोलावण्यात येईल, परंतु आयोगाच्या सुरुवातीच्या काळातच मुख्यमंत्र्यांना चौकशीसाठी बोलावने योग्य होणार नाही, असे मत भीमा कोरेगाव चौकशी आयोगाने व्यक्त केले. भीमा-कोरेगाव चौकशी आयोगासमोर ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी प्रा. म. ना. कांबळे यांची बाजू मांडली. त्यावेळी सरकारी अधिकारी तसेच मंत्र्यांना आयोगासमोर बोलवावे या अर्जावर बोलताना आयोगाने वरील मत व्यक्त केले.
तसेच सुरुवातीच्या काळात आयोग भीमा कोरेगाव येथील हिंसाचाराचे बळी ठरलेले तसेच इतर साक्षीदारांचे जबाब नोंदवत असल्याचे आयोगाने स्पष्ट केले. या दरम्यान जे कुठले नागरिकांसाठी उपलब्ध कागतपत्र आहेत ते अर्ज दाखल करणाऱ्यांना राज्य सरकारने उपलब्ध करून द्यावेत असेही आयोगाने सांगितले. दरम्यान, मुख्यमंत्र्यांना तसेच इतर मंत्र्यांना आयोगासमोर आणायचे कि नाही याची सुनावणी मुंबईत होणार आहे.