कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरण: ८ ते १२ जानेवारीदरम्यान आयोगाची सुनावणी
By नितीन चौधरी | Updated: December 23, 2023 18:28 IST2023-12-23T18:25:35+5:302023-12-23T18:28:28+5:30
कोरेगाव भीमा येथे १ जानेवारी २०१८ रोजी हिंसाचार झाला होता. या प्रकरणी निवृत्त न्यायाधीश जे. एन. पटेल आणि निवृत्त मुख्य सचिव सुमित मलिक असा दोन सदस्यीय आयोग स्थापन करण्यात आला आहे...

कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरण: ८ ते १२ जानेवारीदरम्यान आयोगाची सुनावणी
पुणे : कोरेगाव भीमा येथे झालेल्या हिंसाचार प्रकरणाची चौकशी आयोगामार्फत ८ ते १२ जानेवारीदरम्यान महत्त्वाची सुनावणी होणार आहे. यात वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर, पुणे शहराच्या तत्कालीन पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला, हवेलीच्या तत्कालीन उपविभागीय अधिकारी ज्योती कदम तसेच एल्गार परिषदेच्या आयोजक हर्षाली पोतदार यांची उलटतपासणी होणार आहे.
कोरेगाव भीमा येथे १ जानेवारी २०१८ रोजी हिंसाचार झाला होता. या प्रकरणी निवृत्त न्यायाधीश जे. एन. पटेल आणि निवृत्त मुख्य सचिव सुमित मलिक असा दोन सदस्यीय आयोग स्थापन करण्यात आला आहे. आयोगाकडून मुंबई आणि पुण्यात उलटतपासणी सुरू आहे. त्याकरिता विविध राजकीय नेते, प्रशासनातील अधिकारी तसेच पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्यानुसार ८ ते १२ जानेवारीदरम्यान आंबेडकर, शुक्ला, पोतदार आणि कदम यांची उलटतपासणी घेण्यात येणार आहे. सुनावणीच्या या नियोजनात गरजेनुसार बदल होऊ शकतो, असे आयोगाकडून सांगण्यात आले आहे.