कोरेगाव भीमात अवैध वाळूउपशाकडे काणाडोळा, वाळूतस्करांना अभय महसूलचे की कोणाचे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 12:23 AM2017-11-20T00:23:41+5:302017-11-20T00:23:48+5:30

कोरेगाव भीमा : येथील भीमा नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर वाळूउपसा सुरू असून कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाºयाच्या काही अंतरावरच हा उपसा चालू असल्याने बंधाºयालाही धोका संभवू शकतो.

In Korgaon, on the illegal sand bridge, Kanadola, which is the name of the Abhay Revenue for sandwiches? | कोरेगाव भीमात अवैध वाळूउपशाकडे काणाडोळा, वाळूतस्करांना अभय महसूलचे की कोणाचे?

कोरेगाव भीमात अवैध वाळूउपशाकडे काणाडोळा, वाळूतस्करांना अभय महसूलचे की कोणाचे?

Next

कोरेगाव भीमा : येथील भीमा नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर वाळूउपसा सुरू असून कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाºयाच्या काही अंतरावरच हा उपसा चालू असल्याने बंधाºयालाही धोका संभवू शकतो. महसूल विभागाने बेकायदा वाळूउपसा बंद करण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहेत. महसूल विभागाच्या डोळ्यात धूळफेक करीत वाळूतस्कर उपसा करीत असल्याने यांना अभय कोणाचे? असा सवाल उपस्थित होत आहे.
कोरेगाव भीमा परिसरात भीमा नदीपात्रात कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाºयाला लागलेली गळती व गंजलेले ढापे यामुळे ऐन हिवाळ्यात भीमा नदी कोरडी पडली आहे.
यामुळे नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असतानाच वाळूमाफियांना मात्र सुगीचे दिवस आल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
येथील बंधाºयालगतच वाळूतस्करांनी बेकायदा वाळूउपसा चालू केला असून जेसीबी यंत्राच्या साहाय्याने वाळू काढली जात आहे. तालुक्यातीलच कवठे येमाई येथील रोहिदास पोकळे या शेतकºयाला वाळूतस्करांमुळेच जीव गमवावा लागला असतानाच वाळूतस्करांनी आता आपला मोर्चा इतर भागांकडेही वळविला असल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे.
याबाबत शिरूरचे तहसीलदार रणजित भोसले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी महसूल विभागाच्या भरारी पथकास कोरेगाव भीमा येथील बेकायदा वाळूउपशावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या असल्याचे सांगितले आहे. मात्र वाळूतस्कर गावामध्ये शनिवार, रविवार कामगार तलाठी व मंडलाधिकारी नसल्याचा फायदा घेत वाळूउपसा करीत आहेत. ज्या ठिकाणी कोणाचे लक्ष जाणार नाही, अशा भागातून वाळूउपसा करीत आहेत.
।टाकळी हाजीत कारवाई सुरू
टाकळी हाजी : ‘लोकमत’च्या दणक्याने महसूल प्रशासन जागे होऊ लागले असून, टाकळी हाजीचे मंडल अधिकारी रमेश वाल्मीकी यांनी वाळूच्या ट्रकवर कारवाई सुरू केली आहे. शनिवारी एक ट्रकवर कारवाई करण्यात आली.
याबाबत मंडल अधिकारी रमेश वाल्मीकी यांनी सांगितले, की टाकळी हाजी जांबुत रस्त्याने वाळूने भरलेला ट्रक जात असताना त्याला अडवून पकडण्यात आला आहे. या वेळी त्यांच्यासोबत जांबुतचे तलाठी जयमंगल धुंरधरदेखील होते. या गाडीचा पंचनामा करण्यात आला असून, त्यामध्ये चार ब्रास वाळू असल्याचे वाल्मीकी यांनी सांगितले.
ही गाडी टाकळी हाजी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली आहे.
निघोज (ता. पारनेर) येथून रोज टाकळी हाजीमार्गाने पुणे, चाकण, खेडच्या
दिशेने रोज मोठ्या प्रमामात वाळूवाहतूक केली जाते.
निमगाव दुडे, कवठे येमाई रस्त्यावर वाळू धुण्यासाठी दोन ठिकाणी डिझेल इंजिनचे वॉशिंग सेंटरच सुरू केलेले आहे. वाळू धुतल्यानंतर या गाड्या रस्त्यानेच पाणी गाळत सुसाट सुटतात. शाळेत येणारी मुलं, प्रवासी यांच्या अंगावर पाणी पडते, कपडे खराब होतात. त्यांचा प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. रस्ता तर रोज दोन वेळा पाण्याने ओला होतो. त्यामुळे डांबरी रस्ता खराब झाला असून, या वॉशिंग सेंटरवर कृपा कुणाची, असा सवाल सामान्य जनतेमधून केला जात आहे.

Web Title: In Korgaon, on the illegal sand bridge, Kanadola, which is the name of the Abhay Revenue for sandwiches?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे