कोटेश्वर-प्राचीन शनिमंदिरात शुकशुकाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:18 AM2021-03-13T04:18:17+5:302021-03-13T04:18:17+5:30
डेहणे: कोटेश्वर (भोरगिरी, ता. खेड) येथील प्राचीन शिवमंदिरात भाविकांअभावी शुकशुकाट होता. भीमाशंकर येथील शिवलिंगाच्या दर्शनापूर्वी कोटेश्वर येथील शिवलिंगाचे दर्शन ...
डेहणे: कोटेश्वर (भोरगिरी, ता. खेड) येथील प्राचीन शिवमंदिरात भाविकांअभावी शुकशुकाट होता.
भीमाशंकर येथील शिवलिंगाच्या दर्शनापूर्वी कोटेश्वर येथील शिवलिंगाचे दर्शन अनिवार्य असल्याची श्रद्धा येथील आदिवासी बांधवांमध्ये पूर्वपरंपार आहे. कोरोनाच्या या काळात संसर्ग टाळण्यासाठी भीमाशंकर परिसरात संचारबंदी लागू असल्याने यंदा महाशिवरात्रीला भीमाशंकर मंदिर बंद राहील्यामुळे कोटेश्वर मंदिरात गर्दी होण्याची शक्यता होती. या ठिकाणी दरवर्षी हजारो शिवभक्त येत असतात. परंतु खेड पोलिसांकडून शिरगाव चेकनाक्यावर कडक पोलीस बंद ठेवण्यात आल्याने भीमाशंकरप्रमाणे कोटेश्वर येथे सकाळपासून शुकशुकाट जाणवला. खेडच्या पश्चिम भागातील या निसर्गरम्य शिवमंदिरात दर वर्षी हजारो शिवभक्त दर्शन घेतात. पुणे परिसरात तसेच मुंबईवरुन आलेल्या शेकडो वाहनांना माघारी फिरून जावे लागले. या वेळी पोलीस दिवसभर वाहनचालकांशी हुज्जत घालत असल्याचे चित्र होते. नाईलाजाने अनेकांवर खटला भरावा लागल्याचे व दंड वसूल करावा लागल्याचे पोलीस हवालदार भगवान गिजरे यांनी सांगितले.
फोटो: - कोटेश्र्वर मंदिर भोरगिरी (ता. खेड) येथे दिवसभर शुकशुकाट होता.
-भीमाशंकर व कोटेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर शिरगाव चेकनाक्यावरून पोलीस बंदोबस्त.