कोथरूड हादरले! चार ते पाच जणांच्या टोळक्याकडून कोयत्याने वार करत एकाचा निर्घृण खून

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2024 10:05 AM2024-05-17T10:05:30+5:302024-05-17T10:06:19+5:30

कर्वे रोड परिसरात एका तरुणाचा अतिशय निर्घृणपणे खून करण्यात आला...

Kothrud A gruesome murder of one by a gang of four to five people pune crime | कोथरूड हादरले! चार ते पाच जणांच्या टोळक्याकडून कोयत्याने वार करत एकाचा निर्घृण खून

कोथरूड हादरले! चार ते पाच जणांच्या टोळक्याकडून कोयत्याने वार करत एकाचा निर्घृण खून

- किरण शिंदे

पुणे : पुण्याच्या कोथरूड परिसरातून गुरुवारी मध्यरात्री भयंकर घटना उघडकीस आली. अलंकार पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कर्वे रोड परिसरात एका तरुणाचा अतिशय निर्घृणपणे खून करण्यात आला. चार ते पाच जणांच्या टोळक्याने त्याच्यावर कोयत्याने सपासप वार केले. मध्यरात्री 12 वाजण्याच्या सुमारास कर्वे रस्त्यावरील डहाणूकर कॉलनी परिसरात ही घटना घडली. श्रीनिवास  शंकर वत्सलावर (वय २२, राहणार लक्ष्मी नगर डहाणूकर कॉलनी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. 

याप्रकरणी प्राथमिक माहिती अशी की, मयत श्रीनिवास हा मित्रासोबत मध्यरात्रीच्या सुमारास जात होता. रात्री बारा वाजण्याच्या सुमारास कर्वे रस्त्यावरील गांधी चौक परिसरात पाच ते सहा जणांनी त्यांना अडवले. आणि त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. श्रीनिवास त्याचसोबत असणारा व्यक्ती पळून गेला. मात्र श्रीनिवास हल्लेखोरांच्या ताब्यात सापडला. त्यानंतर हल्लेखोरांनी अतिशय निर्घृणपणे कोयत्याने वार केले आणि घटनास्थळावरून पळ काढला. दरम्यान रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळलेल्या श्रीनिवासला तातडीने नजीकच्या खाजगी रुग्णालयात घेण्यात आले. मात्र तेथे  तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले.

दरम्यान घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. चार ते पाच मारेकरी असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पूर्ववैमस्यातून हा संपूर्ण प्रकार झाला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अलंकार पोलीस ठाण्यात याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Web Title: Kothrud A gruesome murder of one by a gang of four to five people pune crime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.