कोथरूड, एरंडवणा, औध महागडे
By Admin | Published: April 2, 2016 03:40 AM2016-04-02T03:40:43+5:302016-04-02T03:40:43+5:30
राज्यात बांधकाम व्यवसायात मंदीचे वातावरण असल्याने मुंबई, ठाणे, नाशिक, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये खरेदी-विक्रीच्या व्यवहारात घट झाली. परंतु, पुणे शहर आणि जिल्ह्यात मात्र वाढ
पुणे : राज्यात बांधकाम व्यवसायात मंदीचे वातावरण असल्याने मुंबई, ठाणे, नाशिक, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये खरेदी-विक्रीच्या व्यवहारात घट झाली. परंतु, पुणे शहर आणि जिल्ह्यात मात्र वाढ झाली नसली, तरी कोणतीही घट झालेली नाही. यामुळेच नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने राज्यात सर्वाधिक सोलापूर सोडून पुणे जिल्ह्यात रेडीरेकनरच्या दरात सरासरी ९.३७ टक्के वाढ केली आहे. यामध्ये पुणे ग्रामीण भागात तब्बल ११.७० टक्के प्रभावक्षेत्र (झपाट्याने विकसित होणारा भाग) ११ टक्के, नगरपालिका क्षेत्र ११.५० टक्के, पुणे शहर ६ टक्के, पिंपरी-चिंचवड ६.६७ टक्के दरवाढ करण्यात आली आहे.
शहराच्या विविध भागांत फ्लॅट्सचे दर गगनाला भिडले असल्याने लोक ग्रामीण भागाकडे शहरापासून थोडे दूर फ्लॅट खरेदी करण्याचा विचार करतात. पण आता ग्रामीण भागातील रेडीरेकनरमध्ये सरासरी ११ टक्क्यांपेक्षा अधिक वाढ केल्याने सर्वसामान्य नागरिकांना येथे देखील घरखरेदी करणे शक्य होणार नाही.
घोरपडी परिसरात सुचविण्यात आलेले दर संपूर्ण शहरात सर्वाधिक आहेत, तर एरंडवणा आणि शिवाजीनगर, कोथरूड आणि औंध या भागांनी क्रमांक पटकविला आहे. यामध्ये घोरपडी परिसरासाठी १३ हजार ३६९, एरंडवणा १२ हजार ४८०, शिवाजीनगर ११ हजार ३३२, कोथरूड १० हजार ६५७ आणि औंध १० हजार ७१ प्रति चौरस फूट दर प्रस्तावित करण्यात आले आहेत. शहरात सर्वांत कमी ३ हजार ५०० चौरस फूट दर येवलेवाडी परिसरात आहे. गत वर्षीच्या तुलनेत या दरांमध्ये सरासरी एक हजार रुपयांची वाढ झाली आहे.
शहरात फ्लॅटस्चे दर गगनाला भिडले असल्यामुळे लोक ग्रामीण भागाकडे घर घेण्याचा विचार करतात. परंतु आता ग्रामीण भागातील रेडी रेकनरमध्ये सरासरी ११ टक्क्यांपेक्षा अधिक वाढ केल्याने सर्वसामान्य नागरिकांना येथे देखील घर खरेदी करणे शक्य होणार नाही.
मोकळ्या जागांमध्ये सदाशिव पेठ, नारायण पेठ परिसरात सर्वाधिक दर सुचविण्यात आले आहेत. सदाशिव पेठ दर प्रतिचौरस फूटसाठी ८ हजार ७७ रुपये आणि नारायण पेठेत ७ हजार २४९ दर सुचविण्यात आले.
शहरात सर्वांत कमी दर ३ हजार ५०० चौरस फूट दर येवलेवाडी परिसरात आहे.
नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या वतीने गेल्या एक-दोन वर्षांतील फ्लॅट्स व अन्य मिळकतीचे खरेदी-विक्री व्यवहार लक्षात घेऊन रेडीरेकनरचे दर निश्चित करण्यात येतात.
रेडी रेकनरचे दर निश्चित करण्यासाठी ५६ विभाग तयार करण्यात आले असून, त्या विभागातील मोकळ्या जागा आणि फ्लॅट्स यांचे दर सुचविण्यात आले आहेत.
प्रस्तावित दर
विभागकमाल दर
घोरपडी१३३६९
एरंडवणा१२४८१
शिवाजीनगर११३३२
कोथरूड१०६५७
औैंध१००७१
सदाशिव पेठ९९९८
पर्वती९९२७
गुलटेकडी९९७४
येरवडा९७३५
पुणे कॅन्टोमेन्ट८८२९
हिंगणे बु.८५७०
नारायण पेठ८४६७
शनिवार पेठ८२८३
पिंपरी सौदागर७७९९
वाकड७११२
चिंचवड७१६३