kothrud Vidhan Sabha Election Result 2024 Live : कोथरूडमध्ये चंद्रकांत पाटलांचा दणदणीत विजय, मताधिक्क्याची 'लाखा'कडे वाटचाल...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2024 03:04 PM2024-11-23T15:04:47+5:302024-11-23T15:15:23+5:30
kothrud Vidhan Sabha Election Result 2024 Live : चंद्रकांत पाटील यांनी ९० हजारांहून अधिक मतांनी विजय मिळवत पक्षाचा दबदबा कायम ठेवला
kothrud Vidhan Sabha Election Result 2024 Live : पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी ९० हजारांहून अधिक मतांनी विजय मिळवत पक्षाचा दबदबा कायम ठेवला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे चंद्रकांत मोकाटे आणि मनसेचे ॲड. किशोर शिंदे यांच्यासोबत लढत होत असतानाही पाटील यांनी मतदारसंघात ९०,७६९ मतांचे प्रचंड मताधिक्य घेत भाजपच्या बालेकिल्ल्यास साजेसा विजय मिळवला आहे.
आकडेवारी (१६व्या फेरीनंतर):
चंद्रकांत पाटील (भाजप): १,२९,३७२ मते
चंद्रकांत मोकाटे (शिवसेना - उद्धव गट): ३८,६०३ मते
ॲड. किशोर शिंदे (मनसे): १५,३२२ मते
चंद्रकांत पाटील यांचे लीड: ९०,७६९
पुण्यात भाजपचा सहाही मतदारसंघात विजय
पुण्यातील ८ पैकी ६ विधानसभा मतदारसंघ महायुतीच्या जागावाटपामध्ये भाजपच्या वाट्यास आले होते. या सर्व ६ जागांवर भाजपने दमदार विजय मिळवला आहे. कोथरुडमधून चंद्रकांत पाटील, कसबा पेठेत हेमंत रासने, पर्वतीत माधुरी मिसाळ, खडकवासला मतदारसंघात भीमराव तापकीर पुणे कॅंटोन्मेंट मतदारसंघात सुनील कांबळे आणि शिवाजीनगर येथे सिद्धार्थ शिरोळे यांनी विजय मिळवत पुण्यात भाजपचे वर्चस्व कायम ठेवले आहे.
शिवसेना (उद्धव गट) आणि मनसेची निराशा
कोथरूडमध्ये शिवसेना (उद्धव गट) आणि मनसेने उमेदवार दिले होते मात्र प्रमुख नेत्यांनीच प्रचाराकडे कानाडोळा केल्याचे चित्र पाहायला मिळाले नाही.
भाजपसाठी महत्त्वाचा विजय
पुण्यातील महायुतीच्या यशामुळे भाजपसाठी हा विजय केवळ स्थानिक नाही, तर राज्य पातळीवरही महत्त्वाचा मानला जात आहे. कोथरूडसह पुण्यातील सर्व मतदारसंघांमध्ये मिळवलेले यश भाजप पक्ष संघटनेची ताकद अधोरेखित करत आहे.