kothrud Vidhan Sabha Election Result 2024 Live : लीड वाढलं! कोथरूडमध्ये चंद्रकांत पाटलांची २८ हजारांहून अधिक मतांची आघाडी...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2024 12:04 PM2024-11-23T12:04:03+5:302024-11-23T12:06:20+5:30
kothrud Vidhan Sabha Election Result 2024 Live : कोथरूड विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे चंद्रकांत पाटील मोठ्या मतांनी आघाडीवर
kothrud Vidhan Sabha Election Result 2024 Live : पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे चंद्रकांत पाटील मोठ्या मतांनी आघाडीवर आहेत. सहाव्या फेरीअखेर त्यांनी ४२,८९८ मते मिळवत २८,८२४ मतांची आघाडी घेतली आहे. या तिरंगी लढतीत शिवसेना (उद्धव ठाकरे गट) चे चंद्रकांत बालभीम मोकाटे आणि मनसेचे ॲड. किशोर नाना शिंदे हे देखील निवडणूक रिंगणात आहेत.
सहाव्या फेरीनंतर एकूण मते
चंद्रकांत पाटील (भाजप): ४२,८९८ मते
चंद्रकांत मोकाटे (शिवसेना - उद्धव गट): १४,०७४ मते
ॲड. किशोर शिंदे (मनसे): ३,६१५ मते
कोथरूड भाजपचा बालेकिल्ला
कोथरूडमध्ये चंद्रकांत मोकाटे आणि ॲड. किशोर शिंदे हे देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. मात्र कोथरूड हा भाजपचा बालेकिल्ला राहिला असून विधानसभा निवडणुकांमध्ये देखील मतदारांनी भाजप उमेदवार चंद्रकांत पाटील यांनाच पसंती दिल्याचे आतापर्यंतच्या मतमोजणीतून समोर येत आहे.
पुढील फेऱ्यांवर लक्ष
कोथरूडमध्ये एकूण २० फेऱ्यांत मतमोजणी होणार आहे. सहाव्या फेरीअखेर पाटील यांनी आघाडी मोठ्या फरकाने राखली आहे. पुढील फेऱ्यांमध्ये विरोधक चंद्रकांत पाटील यांचे लीड तोडण्यात यशस्वी ठरतात की चंदकांत पाटील घौडदौड पुढेही सुरूच ठेवतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. सध्या तरी कोथरूडमधील मतमोजणीवर भाजपचे वर्चस्व दिसत आहे.
इथे क्लिक करा : महाराष्ट्र विधानसभा निकाल २ ० २ ४