तलाठ्यांनी आजीबार्इंना बनविले कोतवाल
By Admin | Published: July 2, 2017 02:14 AM2017-07-02T02:14:32+5:302017-07-02T02:14:32+5:30
सत्तर वर्षांच्या आजोबा-आजींना तलाठी, कोतवाल लावतात काम. कोतवालाचे काम शेतकऱ्यांनाच करावे लागते़ भोर तालुक्यातील
लोकमत न्यूज नेटवर्क
नेरे : सत्तर वर्षांच्या आजोबा-आजींना तलाठी, कोतवाल लावतात काम. कोतवालाचे काम शेतकऱ्यांनाच करावे लागते़
भोर तालुक्यातील बहुतांशी शेतकऱ्यांना बॅँक कर्ज, विकास सोसायटी कर्ज तसेच इतर कामांसाठी सर्रास सात-बारा, आठ ‘अ’चे उतारे लागत असतात. यासाठी शहरातच असणाऱ्या तलाठी कार्यालयात शेतकऱ्यांना भाऊसाहेबांकडे जावे लागते. मात्र या उतारऱ्यांच्या झेरॉक्स मारण्यासाठी तरुण असो वा वयोवृद्ध शेतकरी असो यांनाच ही काम करावे लागत आसल्याने शेतकरीच कोतवाल बनला असल्याचे दिसून येत आहे़
भोर तालुक्यात बहुतांश तलाठी कार्यालये गावात नसून ती शहरातच आहेत. ही कार्यालये शहरात असल्याने खेडेगावातील शेतकऱ्यांना तलाठी भाऊसाहेबांकडे असणारी कामे आर्र्थिक भुर्दंड सहन करून शहरात येऊनच करावी लागतात. मात्र ही कामे करण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांना भाऊसाहेब चकरा मारायला लावतात. तर कधी उतारा देण्यासाठी स्वत: शेतकऱ्यालाच तलाठ्यांकडील खतावणीवरून झेरॉक्स मारावी लागते. उतारे मिळविण्यासाठी भाऊसाहेबांना दक्षिणाही द्यावी लागत असल्याची चर्चा आहे. कोतवालांचे काम शेतकऱ्यांना करावे लागत असून तलाठी आणि कोतवालांनी शेतकऱ्यांना हे असले काम लावणे अयोग्य असल्याचे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.