महावितरणच्या कर्मचाऱ्यांसाठी कोविड-१९ समन्वय कक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:10 AM2021-04-12T04:10:51+5:302021-04-12T04:10:51+5:30
पुणे : कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांना रुग्णालयातील बेड व इतर आरोग्यविषयक मदत तसेच विविध आरोग्य यंत्रणेशी समन्वय ...
पुणे : कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांना रुग्णालयातील बेड व इतर आरोग्यविषयक मदत तसेच विविध आरोग्य यंत्रणेशी समन्वय साधण्यासाठी, पुणे परिमंडल कार्यालयामध्ये कोविड-१९ समन्वय कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. पुणे परिमंडलातील कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांना आरोग्यविषयक मदत करण्यासाठी हा कक्ष काम करीत आहे.
दरम्यान मागील वषार्पासून आतापर्यंत पुणे परिमंडलातील ३७४ पुरुष व ७६ महिला अशा ४५० अधिकारी यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यापैकी ३४४ जण कोरोनामुक्त झाले असून ९ जणांचा मृत्यू झाला आहे़ मृत्यूमुखी पडलेल्या ९ पैकी ७ जणांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ३० लाख रुपयांची सानुग्रह मदत देण्यात आली आहे. तर सद्यस्थितीत ९७ अधिकारी व कर्मचारी रुग्णालय आणि घरी उपचार घेत आहेत.
कोरोना आपत्तीतही महावितरणचे अभियंता व कर्मचारी सुरळीत व अखंडित वीजपुरठ्यासह विविध ग्राहकसेवा देत आहेत. मात्र पुणे व पिंपरी चिंचवड शहर तसेच ग्रामीण भागात देखील गेल्या महिन्याभरापासून कोरोना संसगार्चा उद्रेक सुरु आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर अनेक अधिकारी व कर्मचारी किंवा त्यांच्या कुटुंबीयांतील व्यक्तींना तातडीने आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी पुणे परिमंडल कार्यालयात कोविड-१९ समन्वय कक्ष स्थापन करण्यात आला आहे. उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी शिरीष काटकर हे कक्षप्रमुख म्हणून काम पाहत आहे. रुग्णालयांशी संपर्क साधून बेड उपलब्ध करून देणे तसेच प्लाज्मा, औषध व इतर आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी हा कक्ष कार्यरत आहे.
महावितरणमधील सर्व कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियातील सदस्यांसाठी कोरोना आजाराचा समावेश असलेला समूह आरोग्यविमा काढण्यात आलेला आहे. कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर आरोग्य सेवेबाबत काही अडचणी असल्यास महावितरणच्या कर्मचाºयांनी किंवा त्यांच्या कार्यालयप्रमुखांनी थेट उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी काटकर यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन प्रभारी मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांनी केले आहे.
-------------------------------