नऱ्हे येथे शिवसेनेच्यावतीने कोविड केअर सेंटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:11 AM2021-04-28T04:11:38+5:302021-04-28T04:11:38+5:30
शहरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना रुग्णांना ऑक्सिजन बेडची कमतरता भासू लागली असल्याने नऱ्हे येथे स्व. बाळासाहेब ठाकरे ...
शहरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना रुग्णांना ऑक्सिजन बेडची कमतरता भासू लागली असल्याने नऱ्हे येथे स्व. बाळासाहेब ठाकरे आरोग्य मंदिर व मोरया हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने तीन मजली कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. यामध्ये एकूण १११ बेड्स असून यामधील ५१ ऑक्सिजन बेड असून उर्वरित ६० बेड हे आयसोलेशन बेड्स आहेत. एक्स-रे, पॅथॉलॉजी लॅब, तज्ज्ञ् डॉक्टर्स, नर्स, रुग्णवाहिका आदींची सोय याठिकाणी करण्यात आली आहे. सध्या कोरोनाबाधित रुग्णांना ऑक्सिजन बेड मिळत नाहीत, मिळाले तर खासगी हॉस्पिटलकडून अव्वाच्या सव्वा रक्कम घेतली जाते. यामुळे गोरगरीब रुग्णांसाठी अत्यल्प फीमध्ये या ठिकाणी सेवा दिली जाणार असल्याचे शिवसेना विभागप्रमुख नीलेश गिरमे यांनी सांगितले.