खेड तालुक्याती कोविड केअर सेंटर बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:11 AM2021-01-23T04:11:51+5:302021-01-23T04:11:51+5:30
राजगुरुनगर : खेड तालुक्यातील म्हाळुंगे येथील म्हाडाच्या इमारतीत सुरु असलेल्या कोविड सेंटर बंद करण्याची नामुष्की आरोग्य विभागावर आल्याने ...
राजगुरुनगर : खेड तालुक्यातील म्हाळुंगे येथील म्हाडाच्या इमारतीत सुरु असलेल्या कोविड सेंटर बंद करण्याची नामुष्की आरोग्य विभागावर आल्याने आता करोनाबाधित रुंग्णासाठी पर्यायी व्यवस्था करण्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत.
खेड तालुक्यातील आरोग्य विभागाच्यावतीने एप्रिल महिन्यात म्हाळुंगे येथील म्हाडाच्या इमारती ताब्यात घेऊन कोविड सेंटर सुरु करण्यात आले होते. करोना रुग्णांचा आकडा वाढु लागल्यामुळे मात्र चांडोली येथील डॉ. आंबेकर वसतिगृहात कोविड सेंटर सुरु करण्यात आले होते. रुग्ण संख्या कमी झाल्यामुळें आणि शाळा सुरु करण्याबाबत हालचाली सुरु झाल्यामुळें हे कोविड सेंटर एक जानेवारी पासुन बंद करुन समाजकल्याण विभागाच्या ताब्यात देण्यात येऊन आता म्हाळुंगे येथील कोविड सेंटर बरोबरच आँक्सिजन बेड सुरु करण्याच्या हालचाली प्रशासनाने सुरु करुन, चांडोली ग्रामीण रुग्णालयातील डीसीएचसी सेंटर बंद करुन सर्व आरोग्य उपचार सुरु करण्याची नागरीकांची मागणी होत असताना. म्हाळुंगे येथील म्हाडाने इमारत खाली करण्याचे पत्र प्रशासानला दिल्याने आरोग्य यत्रंणेला आता पर्यायी कोविड सेंटर सुरु करण्याबाबत जागा शोधण्याच्या हालचाली प्रशासकीय पातळीवर सुरु झाल्या आहेत. याबाबत तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बळीराम गाढवे यांच्याशी संपर्क साधला असता म्हाडाच्या इमारतीची सोडत निघणार असुन, कोविड सेंटर बंद करुन इमारती ताब्यात देण्याचे पत्र मिळाले आहे. लवकरच कोविड सेंटर बंद करावे लागणार असुन पर्यायी व्यवस्था निर्माण करण्यासाठी प्रांत विक्रांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाने विचारविनिमय सुरु केला आहे.
चौकट
चांडोली येथे ४ जुलै ते ३१ डिसेंबर अखेर कोविड सेंटरमधुन ६१६६ संशयित रुग्णांच्या आरटीपीसीआर, स्वँब, अँन्टीजन चाचणी घेण्यात आल्या ९८८ रुग्णांवर उपचार केले तर २५८४ लक्षणेबाधित रुग्णांना भरती करुन बरे झाल्यावर घरी सोडण्यात आले. तर चांडोली ग्रामीण रुग्णालय ४५ आँक्सिजन बेडचे डीसीएचसी सेंटर ५ सप्टेंबर पासुन सुरु करण्यात आले आतापर्यत ४०० करोना रुग्णांवर उपचार करुन बरे केले. एकही रुग्ण दगावला नसल्याची माहिती डॉ. दिपक मुंडे यांनी दिली.