देऊळगावगाडा येथे होणार कोविड केअर सेंटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:08 AM2021-04-26T04:08:53+5:302021-04-26T04:08:53+5:30
दौंड तालुक्यात कोरोनाच्या रोगाने मोठ्या प्रमाणावर थैमान घातले असून, याचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता दवाखाने अपुरे पडू लागले असून ...
दौंड तालुक्यात कोरोनाच्या रोगाने मोठ्या प्रमाणावर थैमान घातले असून, याचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता दवाखाने अपुरे पडू लागले असून ऑक्सिजन पुरवठा, व्हेंटिलेटर, बेडची कमतरता भासू लागली आहे. रुग्णांची वाढत असलेली संख्या पाहता प्रशासन विभाग देखील हतबल झाले आहे. दौंड तालुक्यात आमदार राहुल कुल यांच्या पाठपुराव्यातून तालुक्यातील जवळपास ९ ठिकाणी कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहे. या बाबतीत माहिती देताना आमदार राहुल कुल म्हणाले की, आमदार फंडातून देऊळगावगाडा येथील दीपगृह ॲकेडमीत १०० ऑक्सिजन बेड व २०० विलगीकरण बेड्स असलेले अद्ययावत कोविड केअर सेंटर सुरू करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. या जागेची पाहणी केली असून याठिकाणी सध्या साफसफाई करून बेडस लावण्याचे काम चालू आहे. या प्रसंगी अद्ययावत कोविड केअर सेंटरच्या कामाची पाहणी करताना आमदार राहुल कुल, तहसीलदार संजय पाटील, भीमा पाटसचे उपाध्यक्ष नामदेव बारावकर, भाजपाचे तालुकाध्यक्ष माऊली ताकवणे, तुकाराम ताकवणे, विकास शेलार, दीपगृह ॲकॅडमीच्या प्राचार्या आश्लेषा, डॉ. संदीप देशमुख, सरपंच विशाल बारावकर आदी उपस्थित होते.