बनकर विद्यालयातील कोविड सेंटर आजपासून पुन्हा सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:10 AM2021-03-26T04:10:56+5:302021-03-26T04:10:56+5:30
माजी महापौर वैशाली बनकर म्हणाल्या की, बनकर विद्यालयातील बंद केलेले कोविड सेंटर सुरू केले. पहिल्या दिवशी पाच रुग्णांना ...
माजी महापौर वैशाली बनकर म्हणाल्या की, बनकर विद्यालयातील बंद केलेले कोविड सेंटर सुरू केले. पहिल्या दिवशी पाच रुग्णांना उपचारासाठी दाखल करून घेतले. रात्री उशिरापर्यंत ३० रुग्णांना उपचारासाठी दाखल करून घेतले आहे. हडपसर परिसरातील नागरिकांनी कोविड तपासणी करून घ्यावी आणि वेळीच उपचार करून घ्यावेत, असे त्यांनी सांगितले.
पुणे शहरासह उपनगरामध्ये कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे प्रशासनाने बंद केलेली कोविड सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये हडपसरमधील बनकर विद्यालयातील कोविड सेंटर बंद केले होते. मात्र, पालिका प्रशासनाने हडपसरमधील पहिले कोविड सेंटर सुरू करून नागरिकांना दिलासा दिला आहे. हडपसर परिसरामध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या सर्वाधिक असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने बंद केलेली कोविड सेंटर सुरू केली आहेत. कोरोना रुग्णवाढ ही बाब निश्चितच चिंताजनक आहे. मात्र, कोरोनाबाधितांना वेळीच उपचार मिळाले पाहिजेत, यासाठी बंद केलेले कोविड सेंटर सुरू करून पालिका प्रशासनाने सामान्यांना दिलासा दिला आहे.