कोविडमुळे परिचारिकांचे महत्त्व प्रभावीपणे जाणवले : कापशीकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:11 AM2021-05-13T04:11:50+5:302021-05-13T04:11:50+5:30
नसरापूर (ता. भोर) येथील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत कोविड लसीकरणानंतर मुख्याध्यापिका मंगल मालुसरे यांनी जागतिक परिचारिका दिनानिमित नसरापूर ग्रामस्थांच्या ...
नसरापूर (ता. भोर) येथील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत कोविड लसीकरणानंतर मुख्याध्यापिका मंगल मालुसरे यांनी जागतिक परिचारिका दिनानिमित नसरापूर ग्रामस्थांच्या वतीने परिचारिकांचा सन्मान केला. या वेळी नसरापूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जयदीप कापशीकर, मुख्याध्यापिका मंगल मालुसरे, परिचारिका बिराजदार, तळेकर, पारखे, केसकर, आशासेविका मांढरे, सुपरवायजर ए. बी. नाईक, आप्पा शिंदे व ग्रामस्थ राहीबाई कांबळे उपस्थित होते.
गेल्या वर्षभरापासून कोरोनाने सर्वत्र थैमान घातले आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या आणि मृत्यूचे आकडे हे सर्वसामान्यांची झोप उडवत आहेत. अशाही स्थितीत परिचारिका या मोठ्या हिमतीने रुग्णसेवेला प्राधान्य देत आहेत. रुग्णालयातही परिचारिकांचे कर्तव्य हे सॅल्युट करायला लावणारे आहे. कोविडमुळे गेल्या वर्षभरात कोरोना रुग्णांची काळजी घेण्यासाठी सर्वच परिचारिका आपले कर्तव्य बजावत आहेत. त्यात प्रामुख्याने प्रमुख परिचारिका म्हणून परिचारिका बिराजदार, तळेकर, पारखे, केसकर आदींचा समावेश आहे.
सोबत फोटो व ओळ : नसरापूर (ता. भोर) येथे परिचारिका दिना निमित्त नसरापूर ग्रामस्थांच्या वतीने परिचारिकांचा सन्मान करण्यात आला.