घरातील दागिने गहाण ठेवून उभारले कोविड हॉस्पिटल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:18 AM2021-05-05T04:18:45+5:302021-05-05T04:18:45+5:30
रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने अवघ्या सात दिवसांत जिद्दीच्या जोरावर ही कामगिरी केली. यासाठी ...
रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने अवघ्या सात दिवसांत जिद्दीच्या जोरावर ही कामगिरी केली. यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागला. या विधायक कामासाठी जवळचे मित्र विकास साठे, शांताराम खलसे, श्रीराम पाटील, दशरथ माटवणकर, अर्चना प्रधान यांनी मदतीचा हात पुढे केला. तर प्रसंगी उमेश चव्हाण यांनी स्वतःचे घरातील पत्नी आणि आईचे पस्तीस तोळे दागिने गहान ठेवून तीस लाखांची जुळवाजुळव केली.
कोट
एकीकडे बेड नाहीत, औषध नाही अशा परिस्थितीत लोक आजाराला घाबरण्यापेक्षा उपचार मिळत नाहीत, यामुळे घाबरून जात आहेत. यामध्ये तरुण रुग्णांच्या मृत्यूनंतर सगळीकडे भीतीची मोठी लाट पसरली आहे.अनेक प्रयत्न करूनही बेड उपलब्ध होतच नाहीत हे लक्षात आल्यानंतर आम्ही स्वतःच कोविड हॉस्पिटल सुरु करण्याचे ठरविले. - उमेश चव्हाण
चौकट
या कोविड हॉस्पिटलमध्ये ३३ ऑक्सिजन बेड व २० जनरल बेडची सुविधा उपलब्ध आहे.
डॉ. सलीम आळतेकर, डॉ. किशोर चिपोळे, गिरीश घाग, कुणाल टिंगरे, अपर्णा साठे यांनी हे हॉस्पिटल उभारण्यात मोलाची कामगिरी बजावली. यामध्ये पुणे मनपाचे आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारती आणि माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे तसेच डॉ. अमोल देवळेकर यांनी या कोविड हॉस्पिटल उभारण्यासाठी खूप मदत केली.
रुग्ण हक्क परिषदेच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे रुग्णांना इतर रुग्णालयात योग्य व माफक दरात चांगली सेवा देण्याचे काम केले.
फोटो ओळ - धानोरी येथे सुरू करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज कोविड हॉस्पिटलच्या उद्घाटनप्रसंगी हॉस्पिटलची पाहणी करताना रुग्णहक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण आदी.