माळेगावच्या कोविड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:09 AM2021-03-28T04:09:37+5:302021-03-28T04:09:37+5:30
९ आॅक्सिजन बेड देखील सेवेत माळेगाव : माळेगाव येथील कोविड सेंटरवर पाच महिलांसह चाळीस रुग्णांवर उपचार करण्यात ...
९ आॅक्सिजन बेड देखील सेवेत
माळेगाव : माळेगाव येथील कोविड सेंटरवर पाच महिलांसह चाळीस रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. या कोविड सेंटरमधे अत्यावश्यक रुग्णांना नऊ ऑक्सिजन सुविधेचे बेड तयार करण्यात आले आहेत.
बारामतीत कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन प्रशासनाकडून इंजिनिअरिंग कॉलेजच्या महिला वसतिगृहात ३०० बेडचे सुसज्ज असे कोविड सेंटर तयार केले आहे.या कोविड सेंटरमधे कोरोना रुग्ण दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. या कोविड सेंटरमधील सर्व सोयी व सुविधांचा आढावा माजी सभापती संजय भोसले यांनी घेतला. यावेळी प्रशासक संजीवकुमार मारकड, ग्रामविकास अधिकारी संजय साळुंखे, विश्वास भोसले आदी उपस्थित होते. या कोविड सेंटरमधे सात डॉक्टर,दहा आरोग्य सेविका व चार वॉर्ड बॉय असा स्टाफ असून पणदरे प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. अक्षय अलगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली काम चालते.तसेच येथे दाखल रुग्णांना नाष्टा ,जेवण व औषध उपचार या सुविधा दिल्या जातील. या कोविड सेंटरमधे अत्यावश्यक रुग्णांना नऊ आॅक्सीजन सुविधेचे बेड तयार करण्यात आले असून विनाखर्च उपचार करण्यात येत आहेत, अशी माहिती माळेगावचे प्रशासक संजीवकुमार मारकड यांनी दिली.
—————————————————————
फोटो ओळी : माळेगाव येथील कोविड सेंटरची पहाणी करताना माजी सभापती संजय भोसले व इतर मान्यवर.
२७०३२०२१-बारामती-०६