बिबवेवाडीतील ‘ईएसआयसी’ रुग्णालयात कोविड उपचार सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:11 AM2021-04-14T04:11:21+5:302021-04-14T04:11:21+5:30
बिबवेवाडीतील एम्प्लॉइज स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन रुग्णालयातील खाटा मिळविण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येत होते. या रुग्णालयाला आमदार माधुरी मिसाळ, पालिका ...
बिबवेवाडीतील एम्प्लॉइज स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन रुग्णालयातील खाटा मिळविण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येत होते. या रुग्णालयाला आमदार माधुरी मिसाळ, पालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल, आरोग्यप्रमुख डॉ. आशिष भारती यांनी भेट देऊन पाहणी केली होती.
या रुग्णालयात आधीपासूनच उपलब्ध सुविधेबरोबरच आवश्यक सुविधांची पूर्तता पालिकेच्या वतीने करण्यात आली आहे. विविध कामे करण्यात आली आहेत. यासोबतच ऑक्सिजन, डॉक्टर उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. या ठिकाणी २० एमबीबीएस डॉक्टर उपलब्ध झाले आहेत. एका समन्वय अधिकाऱ्याचीही नेमणूक करण्यात आली आहे.
जम्बो आणि बाणेरमधील कोविड हॉस्पिटलमधील व्हेंटिलेटर दुप्पट झाले असून, या दोन्ही ठिकाणी ८३ व्हेंटिलेटर आहेत. आणखी २० व्हेंटिलेटर खाटा उभारण्यात येणार आहेत. पालिकेच्या रुग्णालयांमध्ये दीड हजार खाटांची उपलब्ध करून देण्यात आल्या असून, यामध्ये १ हजार ४०० ऑक्सिजन, ८३ व्हेंटिलेटर खाटा आहेत.