करंजावणे प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविडची लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:11 AM2021-03-17T04:11:03+5:302021-03-17T04:11:03+5:30
डॅा. नांदेडकर म्हणाले की प्राथमिक आरोग्य केंद्र करंजावणे येथे दि.९ मार्च रोजी कोविडची लस देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. ...
डॅा. नांदेडकर म्हणाले की प्राथमिक आरोग्य
केंद्र करंजावणे येथे दि.९ मार्च रोजी कोविडची लस देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. आज दि.१६ मार्च
पर्यंत २२२ जणांना कोविडची लस देण्यात आली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविडच्या लसीसाठी स्वतंत्र
कक्ष तयार करण्यात आला आहे. या कक्षात डॅा. प्रणोती करपे, डॅा. जयश्री कुमावत, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्यसेविका, आरोग्यसेवक, कर्मचारी काम करीत आहेत. तालुक्यातील व परिसरातील ६० वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिक तसेच ४५ ते ५९ वयोगटातील सहव्याधी असलेल्या व्यक्तींनी व्याधीची उपचार चालू असलेले प्रमाणपत्रासह आरोग्य केंद्रांत यावे कोविडची लसीचा फायदा घ्यावा. येताना सोबत आधारकार्ड व मोबाइल आणावे, असे आवाहन यावेळी वैद्यकीय अधिकारी डाॅ. आर. पी. नांदेडकर यांनी केले आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्र कंरजावणे (ता. वेल्हे) कोविडची लस घेताना ज्येष्ठ नागरिक.