कोयाळी येथे पाच पाणंद रस्ते दळणवळणासाठी केले खुले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:18 AM2021-03-13T04:18:23+5:302021-03-13T04:18:23+5:30

भिवरेवाडी ते त्रिवेणी आश्रम, भिवरेवाडी ते माळरस्ता, भिवरेवाडी ते कोळपेवस्ती, खिरपाडवस्ती ते माळवाडी, रानुबाईमळा ते वडगाव शिव, भिमा नदी ...

At Koyali, five Panand roads were opened for transportation | कोयाळी येथे पाच पाणंद रस्ते दळणवळणासाठी केले खुले

कोयाळी येथे पाच पाणंद रस्ते दळणवळणासाठी केले खुले

Next

भिवरेवाडी ते त्रिवेणी आश्रम, भिवरेवाडी ते माळरस्ता, भिवरेवाडी ते कोळपेवस्ती, खिरपाडवस्ती ते माळवाडी, रानुबाईमळा ते वडगाव शिव, भिमा नदी ते कोजुबाई मंदीर व भाडळेवस्ती ते काळुबाई मंदीर रस्ता मागील अनेक दिवसांपासून बंद होते. परिणामी येथील स्थानिक शेतकऱ्यांना शेतमाल दळणवळण करताना अडचण निर्माण होत होती. यापार्श्वभूमीवर आमदार दिलीप मोहिते- पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक बाळासाहेब कोळेकर, सरपंच गणेश कोळेकर, माजी उपसरपंच विकास भिवरे, अरुण पोकळे, मोहन कोळेकर आदिंनी पुढाकार घेऊन संबंधित शेतकऱ्यांच्या सहमतीने सदरचे रस्ते खुले करण्यास सहमती दर्शविली.

त्यानुसार बुधवारी (दि १०) जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, युवानेते मयुर मोहिते, मंडल अधिकारी विजय घुगे आदींनी पाहणी करून कामास प्रारंभ केला. याप्रसंगी माजी सरपंच गोरक्ष पोकळे, अनिल दिघे, ग्रामपंचायत सदस्य सतीश भाडळे, अजय टेंगले, अलका कोळेकर, सुनिता पांढरे, विठ्ठल कोळेकर, गंगाराम टेंगले, पंकज गायकवाड, तलाठी शरद दाते, वैशाली झेंडे, सारिका विटे, राहुल पाटील, सतीश शेळके, ग्रामसेवक शांताराम ढेंडे आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते.

११ शेलपिंपळगाव

कोयाळी - भानोबाची (ता. खेड) येथे पाणंद रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करताना निर्मला पानसरे.

Web Title: At Koyali, five Panand roads were opened for transportation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.