कोयत्याने वार करणाऱ्यास कोठडी
By admin | Published: January 9, 2017 03:31 AM2017-01-09T03:31:51+5:302017-01-09T03:31:51+5:30
कोयत्याने वार करून रिक्षाचालकास जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या गुन्ह्यातील राहुल चव्हाण (वय २४, रा. वाकड) यास वाकड पोलिसांनी अटक केली.
पुणे : कोयत्याने वार करून रिक्षाचालकास जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या गुन्ह्यातील राहुल चव्हाण (वय २४, रा. वाकड) यास वाकड पोलिसांनी अटक केली. त्याला १२ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
याप्रकरणी शिवाजी मलकप्पा कांबळे (वय ४५, रा. वाकड) यांनी फिर्याद दिली आहे. या गुन्ह्यात संदीप ऊर्फ बाळा शांताराम भोसले (वय २५) आणि विकास सतीश पंडागळे (वय २४) या दोघांना अटक केली आहे. तर इंद्रजित बापू सपकाळ (रा़ वाकड) हा फरार आहे. राहुल चव्हाण आणि शिवाजी कांबळे हे एकाच ठिकाणी राहावयास आहेत. कांबळे हे रिक्षा चालवतात. २१ डिसेंबर रोजी अनिल जाधव याचे पोस्टर रिक्षावर लावण्याबाबत त्यांच्यात भांडण झाले होते. त्यावरून चव्हाणने २३ डिसेंबर रोजी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास वाकडमधील जिंजर हॉटेलसमोर कांबळेवर कोयत्याने
वार केले व त्याच्या रिक्षाची तोडफोड केली. राहुल यास वाकड पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता, सरकारी वकिलांनी त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेला कोयता जप्त करायचा आहे. तसेच फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस कोठडीची मागणी केली. ती न्यायालयाने मान्य केली. (प्रतिनिधी)