कोयना, टाटाचे पाणी भीमा कृष्णात वळवण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:08 AM2021-07-03T04:08:08+5:302021-07-03T04:08:08+5:30

आमदार कुल यांनी मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांची भेट घेत कोयना व टाटा धरणाच्या पाण्यावरती कृष्णा व भीमा खोऱ्यातील नागरिकांचा ...

Koyna, Tata's demand to divert water to Bhima Krishna | कोयना, टाटाचे पाणी भीमा कृष्णात वळवण्याची मागणी

कोयना, टाटाचे पाणी भीमा कृष्णात वळवण्याची मागणी

Next

आमदार कुल यांनी मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांची भेट घेत कोयना व टाटा धरणाच्या पाण्यावरती कृष्णा व भीमा खोऱ्यातील नागरिकांचा हक्क आहे, या विषयावर लक्ष वेधले. या वेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे उपस्थित होते.

कोयना व टाटा धरणांद्वारे जलविद्युत वीजनिर्मितीसाठी कृष्णा खोऱ्यातील पूर्वमुखी पाणी पश्चिमेकडे वळविण्यात येत आहे, पश्चिम महाराष्ट्रात पाण्याची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असताना जलविद्युत वीजनिर्मितीसाठी पूर्वेकडे कृष्णा भीमा खोऱ्यातील पाणी अरबी समुद्राकडे नेले जात आहे. वास्तविक पाहता या पाण्यावर पहिला हक्क असणाऱ्या कृष्णा, भीमा खोऱ्यातील नागरिकांना पाणीटंचाईस सामोरे जावे लागत आहे, ही बाब आमदार कुल यांनी शेखावत यांच्या निदर्शनास आणून दिली. तसेच संपूर्ण महाराष्ट्रात चिबाड, क्षारयुक्त शेतजमिनीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे त्यासंदर्भात चिबाड शेतजमीन निर्मूलन, पृष्ठभागावर व भूपृष्ठ भागाखालील चर खोदून जादा पाण्याचा निचरा करणे संदर्भात एकात्मिक धोरण आखावे तसेच राज्यातील चिबड, पाणथळ झालेल्या जमिनीचे प्राथमिक सर्वेक्षण करण्यात यावे, जल जीवन अभियानांतर्गत राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेमध्ये पुणे जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचा योजना नसलेल्या अधिकाधिक ग्रामपंचायतींचा समावेश व्हावा, अशी मागणीही त्यांनी या वेळी केली.

०२ केडगाव कूुल

दिल्ली येथे केंद्रीय जलमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्याशी चर्चा करताना आमदार राहुल कुल.

Web Title: Koyna, Tata's demand to divert water to Bhima Krishna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.