पुण्यात पुन्हा कोयता गँगचा धुमाकूळ! किरकटवाडीत टोळक्याने प्राणघातक हल्ला करून माजविली दहशत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2024 11:48 AM2024-06-22T11:48:46+5:302024-06-22T11:50:01+5:30

ही घटना किरकटवाडी येथील भैरवनाथनगर परिसरात गुरुवारी रात्री साडेसात ते नऊ वाजण्याच्या सुमारास घडली....

Koyta gang again in Pune!  In Kirkatwadi, the gang caused terror by carrying out a deadly attack | पुण्यात पुन्हा कोयता गँगचा धुमाकूळ! किरकटवाडीत टोळक्याने प्राणघातक हल्ला करून माजविली दहशत

पुण्यात पुन्हा कोयता गँगचा धुमाकूळ! किरकटवाडीत टोळक्याने प्राणघातक हल्ला करून माजविली दहशत

धायरी (पुणे) : सिंहगड रस्ता परिसरातील किरकटवाडी येथे एका टोळक्याने दोन जणांवर कोयत्याने प्राणघातक हल्ला करून दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. ही घटना किरकटवाडी येथील भैरवनाथनगर परिसरात गुरुवारी रात्री साडेसात ते नऊ वाजण्याच्या सुमारास घडली.

या प्रकरणी हवेली पोलिसांनी वेगाने तपास करत अवघ्या सहा तासांत नऊ आरोपींना ताब्यात घेतले असून, याबाबत मंगेश हगवणे (वय ४६ वर्षे, रा.किरकटवाडी, सिंहगड रस्ता, पुणे) यांनी हवेली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या गुन्ह्यात साहिल रणखंबे, शंतनू प्रकाश कदम, सनी व्यंकटेश बनसोडे, सोमेश मोहन माटे, अरुण रावसाहेब वंजारे, सचिन मारुती बोरुडे, शरद बाळाप्पा कांबळे (सर्व रा.किरकटवाडी, सिंहगड रस्ता, पुणे) या आरोपींना हवेली पोलिसांनी ताब्यात घेतले असून, मुख्य आरोपी विल्यम पीटर हा जखमी असून, पोलिसांच्या निगराणीखाली त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तसेच या गुन्ह्यात एका अल्पवयीन मुलालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, गुरुवारी रात्री तक्रारदार मंगेश हगवणे हे स्वतःच्या घरासमोर असताना अचानकपणे आलेल्या दहा ते पंधरा जणांच्या टोळक्याने त्यांचा भाऊ सौरभ हगवणे, तसेच दीपाली हगवणे यांना जबर मारहाण केली. याबाबत हवेली पोलिसांनी माहिती मिळताच, पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली, तसेच आरोपींच्या शोधार्थ तीन तपास पथके तयार केली. घटना घडल्यानंतर अवघ्या सहा तासांत नऊ आरोपींना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले असून, या गुन्ह्यात सहभागी असणाऱ्या इतर आरोपींचा शोध पोलिस घेत आहेत.

ही कामगिरी पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे यांच्या सूचना व आदेशानुसार पोलिस उपअधीक्षक भाऊसाहेब ढोले, पोलिस निरीक्षक सचिन वांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सागर पवार, सहायक पोलिस उपनिरीक्षक सुभाष गिरे, आबा आंबेकर, पोलिस हवालदार दिनेश कोळेकर, संतोष तोडकर, अशोक तारू, विजय कांबळे, पोलिस नाईक गणेश धनवे, संतोष भापकर, दीपक गायकवाड, पोलिस अंमलदार समाधान चोरमले, व्यंकट काळे, स्वप्निल साळुंखे यांच्या पथकाने केली.

Web Title: Koyta gang again in Pune!  In Kirkatwadi, the gang caused terror by carrying out a deadly attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.