क्रांतिवीर लहूजी वस्ताद साळवे स्मारक मार्गी

By admin | Published: November 25, 2014 11:55 PM2014-11-25T23:55:20+5:302014-11-25T23:55:20+5:30

आद्यक्रांतिकारक लहूजी वस्ताद साळवे यांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी येरवडा संगमपूल येथील समाधिस्थळाशेजारील स्मारकाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.

Krantiveer Lahuji Vastad Salve Memorial Margi | क्रांतिवीर लहूजी वस्ताद साळवे स्मारक मार्गी

क्रांतिवीर लहूजी वस्ताद साळवे स्मारक मार्गी

Next
पुणो : आद्यक्रांतिकारक लहूजी वस्ताद साळवे यांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी येरवडा संगमपूल येथील समाधिस्थळाशेजारील स्मारकाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.  या स्मारकासाठी पाच एकर जागेचे भूसंपादन करण्यासाठी केंद्र शासनाच्या नवीन भूसंपादन कायद्यांतर्गत द्याव्या लागणा:या मोबदल्यासठी 11 कोटी 87 लाख रुपये देण्यास स्थायी समितीच्या  मंगळवारी झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. समितीच्े  अध्यक्ष बापूराव कर्णेगुरुजी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. नवीन कायद्यानुसार, या जागेसाठी 16 कोटी 46 लाख रुपये देण्याचा निवाडा मंजूर करण्यात आलेला आहे. त्यातील 4 कोटी 59 लाख रुपये महापालिकेने दोन वर्षापूर्वीच राज्यशासनाकडे जमा केले असल्याचे कर्णे यांनी सांगितले. सुमारे पाच एकर जागेत हे स्मारक उभारण्यात येणार आहे. या निर्णयामुळे या ठिकाणी उभारण्यात येणा:या या  राष्ट्रीय स्मारकाच्या कामाला गती मिळणार असल्याचे  कण्रे यांनी स्पष्ट केले. 
या बरोबरच शहरातील ऐतिहासिक नाना वाडा जतन आणि संवर्धनाचे काम सुरू आहे. त्याच्या दुस:या टप्प्यातील निधीलाही मान्यता देण्यात आली आहे. त्यासाठी 9क् लाख रुपये निधीची आवश्यकता होती. बंडगार्डन येथील जुना पूल येथील सौंदर्यीकरण, स्कायवॉक दुरुस्तीसाठी एकूण 46 लाख रुपयांच्या निधीला मान्यता देण्यात आली असल्याचेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)

 

Web Title: Krantiveer Lahuji Vastad Salve Memorial Margi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.