कृषिरत्न डॉ. बुधाजीराव मुळीक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:09 AM2021-05-29T04:09:13+5:302021-05-29T04:09:13+5:30
बारामती: कृषिरत्न डॉ. बुधाजीराव मुळीक सर कोरोना केअर सेंटरचे उद्घाटन खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते ...
बारामती: कृषिरत्न डॉ. बुधाजीराव मुळीक सर कोरोना केअर सेंटरचे उद्घाटन खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले.
तिरंगा फाउंडेशन संचलित कृषिरत्न डॉ. बुधाजीराव मुळीक कोरोना केअर सेंटर पवारवाडी-फलटण येथे सुुरू करण्यात आले आहे. तिरंगा फाउंडेशनने गेल्या काही दिवसांपासून कोरोनाग्रस्त रुग्णांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. सध्याच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी एक कोरोना केअर सेंटरची आवश्यकता होती, त्यासाठी तिरंगाचे चेअरमन रणजित शिंदे यांनी पुढाकार घेतला.
कृषिरत्न डॉ. बुधाजीराव मुळीक सरांच्या नावाने कोरोना केअर सेंटरचे हे चालू करण्याचे नियोजन करण्यात आले. त्यासाठी सर्व तिरंगा फाउंडेशनचे स्वयंसेवक कामाला लागले. अवघ्या एक आठवड्यात कोरोनाचे केअर सेंटर उभे केले. त्यासाठी संपूर्ण ग्रामस्थ हनुमंतवाडी, पवारवाडी व तसेच इतर सामाजिक कार्यकर्ते यांनी स्वत: जबाबदारी घेऊन या कामास मूर्त स्वरूप दिले. तिरंगा फाउंडेशनच्या सचिव रजनी शिंदे यांनी ग्रामीण युवाशक्तीला यात सहभागी करून घेतले.
कृषिरत्न डॉ. बुधाजीराव मुळीक सर कोरोना केअर सेंटरचे उद्घाटन खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले.
२८०५२०२१-बारामती-०७