केएसबी लिमिटेड ने प्रस्तुत केली उर्जाकार्यक्षम उत्पादनांची नवीन श्रेणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2023 12:00 PM2023-08-28T12:00:21+5:302023-08-28T12:00:56+5:30
Pune: केएसबी लिमिटेड या भारतातील आघाडीच्या पंप्स आणि व्हाल्व्ह्स बनवणार्या कंपनी ने नुकताच महाराष्ट्र आणि गुजरात मधील त्यांच्या वितरकांचा मेळावा, महाराष्ट्रातील लोणावळा या ठिकाणी आयोजित केला .
पुणे - केएसबी लिमिटेड या भारतातील आघाडीच्या पंप्स आणि व्हाल्व्ह्स बनवणार्या कंपनी ने नुकताच महाराष्ट्र आणि गुजरात मधील त्यांच्या वितरकांचा मेळावा, महाराष्ट्रातील लोणावळा या ठिकाणी आयोजित केला . या मेळाव्याच्या निमित्ताने काही महत्त्वाच्या आणि उर्जाकार्यक्षम उत्पादनांची प्रस्तुती करण्यात आली. यामध्ये ‘के.एस.टी.पी’ (सिवेज पंप), १ अश्वशक्ती (एचपी) व २ अश्वशक्ती (एचपी) डिवॉटरिंग या वापरकरिता तसेच ‘यू.एन.एम.’ सिरिज या १०० मिमि बोरवेल करिता उपयुक्त अशा ऑईल फिल्ड पंपाची प्रस्तुती करण्यात आली, जे की घरगुती वापरा करिता असणारी उत्पादन आहेत.
याचबरोबर, १५०मि मि बोअरवेल साठी उपयुक्त (५० फूट पर स्टेज) यू.पी. एफ.एन. सिरिज आणि ३० ए. पी. पर्यंतचे मोनोब्लॉक पंप (अल्ट्रा प्लस सिरिज) व पाणबुडी पंप अर्थात ओपनवेल पंप ३ ते ७.५ एच. पी पर्यंत या उत्पादनांना वितरकांसमोर सादर करण्यात आले. ही उत्पादने प्रामुख्याने कृषी क्षेत्रातील पाण्याच्या वापराकरिता सर्वोत्कृष्ट पर्याय देतात.
या प्रसंगी बोलतांना कंपनीच्या विक्री विभागाचे व्हाईस प्रेसिडेंट फारुख भथेना यांनी सांगितले “ के एस बी ने कायमच नाविन्यपूर्ण आणि उर्जाकार्यक्षम अशी उत्पादने देण्यावर भर दिला असून ही उत्पादने योग्य किंमतीत देऊन ग्राहकांचा विश्वास जिंकला आहे. आमच्या ग्राहकांबरोबरचे आमचे सौहार्दपूर्ण संबंध आंम्हाला काहीतरी नवीन करण्यास प्रेरित करतात आणि आम्ही हे सुनिश्चित करतो की आमची उत्पादने कमी देखभाल खर्चात, वापरण्यास सोपी व टिकाऊ असतील. या मेळाव्यास उपस्थित असलेल्या वितरकांनी के एस बी च्या नवीन घरगुती कृषी उत्पादनांचे कौतुक केले. सध्याचा ग्राहक हा जागरुक असून योग्य शाश्वत आणि उच्च गुणवत्ता असणार्या उत्पादनांना प्राधान्य देण्याचा कल पाहता आंम्हाला खात्री आहे की या उत्पादनांना बाजारपेठेतून उत्तम प्रतिसाद मिळले.”