२५ वर्षात कुडे ग्रामपंचायत प्रथमच बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:34 AM2021-01-08T04:34:59+5:302021-01-08T04:34:59+5:30
कुडे ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध करण्यास ग्रामस्थांना यश आले असुन यामध्ये जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य दिलीप मेदगे , ...
कुडे ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध करण्यास ग्रामस्थांना यश आले असुन यामध्ये जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य दिलीप मेदगे , चेअरमण बबनराव लोखंडे , संजय कामथे सुरेश धंद्रे , भिमाजी मेदगे , बसंत धंद्रे , राम कामथे आदींनी या साठी प्रयत्न केले
बिनविरोध निवडूण आलेले सदस्य प्रभाग क्र १ शंकर दगडू गेंगजे, भिमाबाई सावळेराम दिघे , वर्षा बबन धंद्रे, प्रभाग क्र २ माणिषा सचिन धंद्रेकैलास पोपट आढळ , प्रभाग क्र ३
गणेश सोमा बांगर, मंगल रोहिदास बांगर , कुडे बु ता खेड येथील ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाल्याची मराठी वाहिन्यावर प्रसिद्ध असलेल्या '''' चला हवा येऊ द्या " च्या टिमणे दखल घेतली असुन या माधिल भाऊ कदम , कुशल बद्रिके, आणी श्रेया बुगडे यांनी गावची निवडणूक बिनविरोध करून गावामध्ये निवडणूकिने होणारे वाद टाळून गावातील वातावरण खेळीमेळीचे ठेवल्या बद्दल ग्रामस्थांचे अभिनंदन केले आहे
--
फोटो . कुडे बु ता खेड येथील ग्रामपंचायती मध्ये निवडून आलेले ग्रामपंचायत सदस्य सोबत जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख व जिल्हा नियोजन समिती माजी सदस्य दिलीप मेदगे.