मानवधर्माचे नूतनीकरण करणारा कुंभमेळा : बापट

By admin | Published: September 24, 2015 02:51 AM2015-09-24T02:51:19+5:302015-09-24T02:51:19+5:30

कुंभमेळा हा मंगलमय सोहळा असून, साधु-संत व महंत यांचा अनोखा संगम आहे. दर १२ वर्षांनी होणारा हा कुंभमेळा मानवतेच्या धर्माचे नूतनीकरण करणारा सोहळा असून

Kumbh Mela renewing humanism: Bapat | मानवधर्माचे नूतनीकरण करणारा कुंभमेळा : बापट

मानवधर्माचे नूतनीकरण करणारा कुंभमेळा : बापट

Next

जुन्नर : कुंभमेळा हा मंगलमय सोहळा असून, साधु-संत व महंत यांचा अनोखा संगम आहे. दर १२ वर्षांनी होणारा हा कुंभमेळा मानवतेच्या धर्माचे नूतनीकरण करणारा सोहळा असून, यापुढील काळात पारुंडे कुंभमेळ्यासाठी राज्य शासनाच्या आर्थिक बजेटमध्ये स्वतंत्र तरतूद करणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न नागरी पुरवठामंत्री आणि पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले.
श्री क्षेत्र पारुंडे येथील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणप्रसंगी पालकमंत्री गिरीश बापट बोलत होते. या वेळी खासदार शिवाजीराव आढळराव -पाटील, आमदार शरद सोनावणे, मठाधिपती महंत गंगानाथजी महाराज, बेलनाथ महाराज यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. त्यानंतर नाथ संप्रदाय साधूंच्या मठात आखाड्याचे राजे निर्मलनाथ महाराज व सुरूजनाथ महाराज, सोमनाथ महाराज यांनी भक्ताना आशीर्वाद दिला.
बापट म्हणाले, ‘‘कुंभमेळ्यासारखा पवित्र सोहळा पारुंडे येथे होत असल्याने जुन्नर तालुक्यात एक सकारात्मकतेचे वातावरण निर्माण झाले असून, त्या वातावरणातून प्रत्येकाला एक ऊर्जा प्राप्त होणार आहे़ या पुढील काळात दर वर्षी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून व राज्य शासनाच्या बजेटमध्ये विशेष तरतूद करून पारुंडे व परिसरात विविध विकासकामे हाती घेतली जातील़ लोक सहभागातून होणाऱ्या कुंभमेळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे यासाठी विद्यार्थी, महिला, आबाल-वृद्धांसह असंख्य नागरिकांचा सहभाग आहे, ही कौतुकास्पद बाब आहे.’’

Web Title: Kumbh Mela renewing humanism: Bapat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.