पुणे-मऊ जंक्शनदरम्यान धावणार कुंभमेळा ट्रेन
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 16:48 IST2025-01-10T16:46:58+5:302025-01-10T16:48:43+5:30
पुणे-मऊ जंक्शन कुंभमेळा स्पेशल ट्रेन पुण्याहून सकाळी १० वाजून १० मिनिटांनी निघेल आणि पुढच्या दिवशी रात्री ११ वाजता पोहोचणार

पुणे-मऊ जंक्शनदरम्यान धावणार कुंभमेळा ट्रेन
पुणे : पुणे ते मऊ जंक्शनदरम्यान अतिरिक्त कुंभमेळा विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. प्रवाशांची अतिरिक्त गर्दी दूर करण्यासाठी मध्य रेल्वेने हा निर्णय घेतला आहे.
पुणे-मऊ जंक्शन कुंभमेळा स्पेशल ट्रेन पुण्याहून सकाळी १० वाजून १० मिनिटांनी निघेल आणि पुढच्या दिवशी रात्री ११ वाजता पोहोचणार आहे. १६ व २४ जानेवारी, ६, ८ आणि २१ फेब्रुवारी राेजी ही गाडी धावणार आहे. मऊ-पुणे कुंभमेळा विशेष गाडी मऊ येथून रात्री ११ वाजून ५० मिनिटांनी सुटणार असून, तिसऱ्या दिवशी दुपारी ३ वाजून ४५ मिनिटांनी पुण्याला पोहोचेल. ही गाडी १७, २५ जानेवारी आणि ७, ९ फेब्रुवारी या दिवशी धावणार आहे.
या गाडीला दौंड कॉर्ड लाईन, अहिल्यानगर, बेलापूर, मनमाड, जळगाव, भुसावळ, खंडवा, तलवडिया, छनेरा, खिरकीया, हरदा, बानापुरा, इटारसी, पिपरिया, नरसिंगपूर, जबलपूर, कटनी, मैहर, सतना, माणिकपूर, प्रयागराज छियोकी, चुनार, वाराणसी, शहागंज आणि आझमगड आदी स्थानकावर थांबे देण्यात आले आहेत.