कुरुलकर ई मेल मार्फत पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेच्या संपर्कात; ATS च्या तपासात धक्कादायक बाबींचा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2023 04:21 PM2023-05-09T16:21:30+5:302023-05-09T16:21:37+5:30
प्रदीप कुरुलकर यांच्याकडील मोबाईल फोन, लॅपटॉप आणि पेन ड्राईव्ह मधील डेटा त्यांनी डिलीट केला, तो नक्की काय हे तपासला जाणार
पुणे : पाकिस्तानला गोपनीय माहिती पुरविल्याच्या आरोपावरून दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) अटक केलेल्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे (डीआरडीओ) संचालक आणि वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर याच्या कोठडीची मुदत मंगळवारी संपणार आहे. कुरुलकर याला आज एटीएसच्या पथकाकडून न्यायालयात हजर करणार आले होते. एटीएसच्या तपास अहवालातून अनेक धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रदीप कुरुलकर हे ई मेल मार्फत पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांच्या संपर्कात होते असं ए टी एस च्या तपासात निष्पन्न झाल आहे.
ए टी एस ने प्रदीप कुरुलकर यांचे जप्त केलेले मोबाईल, लॅपटॉप आणि इतर तांत्रिक साहित्य फॉरेन्सिक लॅबोरेटरीकडे तपासणीसाठी पाठवले होते. त्यातुन ही बाब समोर आली आहे. त्याचबरोबर प्रदीप कुरुलकर हे डी आर डी ओ गेस्ट हाऊसमधे अनेक महिलांना भेटत होते. त्याचाही तपास करण्याची गरज असल्याच ए टी एस ने न्यायालयात सांगितलय. प्रदीप कुरुलकर यांच्या बॅक अकाउंटमधे बाहेरच्या देशातून पैसै आले का याचाही तपास ए टी एस कडून करण्यात येणार आहे. प्रदीप कुरुलकर यांनी सरकारी पासपोर्टचा उपयोग करुन पाच ते सहा देशांना भेटी दिल्याच ए टी एस ला आढळून आल आहे. प्रदीप कुरुलकर यांच्याकडील मोबाईल फोन, लॅपटॉप आणि पेन ड्राईव्ह मधील डेटा त्यांनी डिलीट केला आहे. तो डेटा नक्की काय होता आणि तो त्यांनी पाकिस्तानी गुप्तचर विभागाला दिलाय का याचा तपास करण्याची गरज असल्याच ए टी एस ने न्यायालयात सांगितल आहे. तपास कामासाठी १५ मेपर्यंत ते ats च्या ताब्यात राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.