पुणे विद्यापीठाच्या वनिता मुळे या विद्यार्थिनीस प्रतिष्ठेची केव्हीपीअाय शिष्यवृत्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 08:32 PM2018-06-20T20:32:14+5:302018-06-20T20:32:14+5:30
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वनिता मुळे या विद्यार्थीनीला प्रतिष्ठेची केव्हीपीअाय शिष्यवृत्ती मिळाली अाहे.
पुणे : वनिता मुळे या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील बायाेइन्फाॅरमॅटिक्स व बायाेटेक्नाॅलाॅजी विभागातील (अायबीबी) विद्यार्थीनीला प्रतिष्ठेची केव्हीपीअाय (किशाेर वैज्ञानिक प्राेत्साहन याेजना) शिष्यवृत्ती मिळाली अाहे. अायबीबीमध्ये दुसऱ्या वर्षात शिकत असलेल्या वनिताने ही शिष्यवृत्ती मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या यादीत 51 वे स्थान मिळविले अाहे.
विज्ञान क्षेत्रातील संशाेधनास उत्तेजन देण्यासाठी 1999 मध्ये सायन्स अॅण्ड टेक्नाॅलाॅजी (डीएसटी), भारत सरकारकडून ही याेजना कार्यन्वित करण्यात अाली हाेती. संशाेधनामध्ये कारकिर्द घडवू इच्छिणाऱ्या प्रतिभावान अाणि प्रेरित विद्यार्थ्यांना अाेळखणे अाणि त्यांना प्राेत्साहित करणे, हा या याेजनेचा मुख्य उद्देश अाहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षमतेची जाणीव करुन देणे व देशातील संशाेधन अाणि विकासासाठी सर्वाेत्तम वैज्ञानिक प्रतिभांची निर्मिती करणे, हे ध्येय या याेजनेंतर्गत निश्चित करण्यात अाले अाहे. निवडलेल्या केव्हीपीअाय फेलाेला पूर्व पीएच.डी पर्यंत व पाच वर्षांपर्यंत (जे अाधी असेल ते) उदार फेलाेशिप अाणि अाकस्मिकता अनुदान दिले जाते. याशिवाय, केव्हीपीवाय फेलाेसाठी देशातील प्रतिष्ठित संशाेधन व शैक्षणिक संस्थांमध्ये उन्हाळी शिबिरे अायाेजित केली जातात.
केव्हीपीअाय फेलाेशिप मिळाल्याबद्दल मला अत्यंत अानंद हाेत अाहे. या शिष्यवृत्तीमुळे विज्ञान क्षेत्रातील संशाेधन करण्याचा माझा उत्साह वाढला अाहे. अशी प्रतिक्रिया वनिताने या पार्श्वभूमीवर व्यक्त केली.