बारामतीत मजूराच्या ३ वर्षीय मुलावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; ५५ टाके घालत डॉक्टरांनी केले उपचार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2022 07:29 PM2022-11-15T19:29:42+5:302022-11-15T19:30:14+5:30

गंभीर अवस्थेत असलेल्या मुलाला पाहून डॉक्टरांनी मोफत उपचार केले

Laborer 3-year-old son attacked by stray dogs in Baramati The doctor treated by inserting 55 stitches | बारामतीत मजूराच्या ३ वर्षीय मुलावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; ५५ टाके घालत डॉक्टरांनी केले उपचार

बारामतीत मजूराच्या ३ वर्षीय मुलावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; ५५ टाके घालत डॉक्टरांनी केले उपचार

Next

बारामती : बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे बुद्रूक परिसरात सोमवारी(दि १४) अत्यंत हृदयद्रावक अशी घटना घडली. ऊसतोडणीसाठी आलेल्या तोडणी कामगाराच्या मुलावर भटक्या कुंत्र्यांनी हल्ला केला आहे. कुत्र्यांच्या हल्यात फाटलेल्या जबड्याला सुमारे ५५ टाके घालत त्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. येथील श्रीपाल हॉस्पिटलच्या डॉ.  राजेंद्र मुथा व डॉ. सौरभ मुथा या पिता-पुत्रांनी प्रयत्नांची शिकस्त करत त्या मुलावर यशस्वी उपचार केले.

 पाथर्डी तालुक्यातील ऊसतोडणी कामगार सध्या सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याकडे ऊसतोडणीसाठी आले आहेत. कोऱ्हाळे बुद्रूक नजीक एका ठिकाणी सध्या ते वास्तव्यास आहेत. सोमवारी सायंकाळी ऊसतोडणी कामगाराचा युवराज राठोड (वय ३ वर्ष) हा कोपीसमोर खेळत होता. यावेळी भटक्या कुत्र्यांनी त्याला अचानक घेरले. त्याच्यावर जोरदार हल्ला चढवत युवराजच्या जबडयाला चावले. यात तो गंभीर जखमी झाला. त्याच अवस्थेत पालकांनी त्याला श्रीपाल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आणले. डॉ. राजेंद्र मुथा व डॉ. सौरभ मुथा यांनी परिस्थितीचे गांभिर्य लक्षात घेत त्याच्यावर तातडीने उपचार सुरु केले. मात्र, राठोड कुटुंब गरीब असल्याने उपचारासाठी त्यावेळी पैसे नव्हते. गंभीर अवस्थेत असलेल्या मरणाच्या दारात असलेल्या बालकाला पाहुन मदत करण्याचा निर्णय घेतला. त्याला स्व:खचार्तून आवश्यक औषधे, इतर साहित्य आणले. मुलाचा जीव वाचविण्यासाठी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. सोमवारी रात्री उशीरा डॉ.राजेंद्र, डॉ सौरभ यांनी दंतरोगतज्ञ डॉ.आशुतोष आटोळे यांच्यासह युवराजवर शस्त्रक्रिया केली. त्याला जवळपास ५५ टाके घालत त्यावर यशस्वी उपचार केले.

Web Title: Laborer 3-year-old son attacked by stray dogs in Baramati The doctor treated by inserting 55 stitches

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.