Pune | धोकादायक झालेल्या पुलावरून पडून मजुराचा मृत्यू; इंदापूर तालुक्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2022 01:30 PM2022-12-21T13:30:53+5:302022-12-21T13:31:24+5:30
या धोकादायक पुलासंदर्भात अनेक वृत्तपत्रांमधून बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. परंतु या पुलाची दुरुस्ती चार ते पाच वर्षात झालेली नाही....
निमगाव केतकी (पुणे) : निरा डावा कालव्यावरील अनेक वर्षापासून धोकादायक झालेल्या पुलावरून पडून बबन भीमा चांदणे (वय ५०) या मजुराचा मंगळवारी (दि. २०) संध्याकाळी कालव्यात पडून मृत्यू झाला. ही घटना इंदापूर तालुक्यातील शेळगाव, तेलओढा येथे घडली. या धोकादायक पुलासंदर्भात अनेक वृत्तपत्रांमधून बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. परंतु या पुलाची दुरुस्ती चार ते पाच वर्षात झालेली नाही.
या पुलाच्या दुरुस्तीकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केलेल्या सार्वजनिक बांधकाम विभाग व जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शेळगाव व तेलओढा येथील ग्रामस्थांनी केली आहे. दुरूस्ती संदर्भात जलसंपदा विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकाऱ्यांनी हा पुल आमच्याकडे नाही म्हणून दुर्लक्ष केले होते. अखेर याच धोकादायक पुलावरून पडून एक मजुराचा मृत्यू झाला.
या घटनेचा पंचनामा पोलिस उपनिरीक्षक विजय टेळकींकर, पोलीस मोहन ठोंबरे यांनी करून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी पाठवण्यात आला.